लिंबागणेश येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांची किर्तनाने सांगताकिर्तन, महापुराण, यज्ञ व संत महंतांचा सत्कार सोहळा संपन्न


लिंबागणेश प्रतिनिधी):बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्री भालचंद्र गणपती देवस्थानच्या वतीने श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत श्रीमत् गणेश महापुराण कथा व पंचकुंडी गणेश यज्ञास शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी विधिवत प्रारंभ झाला होता.
या धार्मिक सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची विस्तृत रूपरेषा आखण्यात आली होती. बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी श्री भालचंद्र गणेशाचा महाभिषेक, श्रीमत् गणेश महापुराण कथेचे वाचन, श्री मन्मथ स्वामी पालखी आगमन सोहळा तसेच हरिपाठ कार्यक्रम भक्तिभावात पार पडला.
यानंतर पुढील दिवशी सर्व ब्रह्मवृदांच्या हस्ते सहस्त्र आवर्तन महाभिषेक करण्यात आला. यावेळी गणेश जन्मकथेचे वाचन तसेच डॉ. वीरूपक्ष शिवाचार्य स्वामी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनातून त्यांनी भक्ती, संस्कार व धार्मिक परंपरेचे महत्त्व भाविकांना पटवून दिले.
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाची सांगता शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर यांच्या सुश्राव्य व प्रेरणादायी किर्तनाने झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या निमित्ताने देवस्थानामार्फत संत महंतांचा सत्कार तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष चिंतामण जोशी, पुजारी विश्वस्त श्रीकांत जोशी, मंगेश जोशी, व्यवस्थापक सुंदर भाऊ वाणी, पुजारी वरदराज जोशी, स्वयंसेवक चेतन कानिटकर, अमोल घोलप, दिनेश कुलकर्णी तसेच गावातील सर्व तरुण मंडळ, ग्रामस्थ व भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी