आपली कला,परंपरा, भाषा,संस्कृती व इतिहासाच प्रबोधन करनाऱ्या 'तमाशा' ला वाचावा - डॉ जितीन वंजारे
आम्ही लहान असताना माझे वडील आम्हाला आवर्जून पाच-दहा रुपये द्यायचे यात्रेत किंवा गावात तमाशा बघण्यासाठी. माझा छोटा भाऊ आणि मी मित्रांसोबत तमाशा बघायला जायचो. कळत काहीच नव्हतं पण तमाशाने माणूस नक्कीच बदलतो कदाचित हाच त्यामागचा पूर्वजांचा उद्येश असावा.त्याकाळी हाफ तिकीट पाच रुपये असायच नंतर सात,दहा, पंधरा आणि तसच वाढत गेलं. दिवाळी झाली की पंधरा ते वीस दिवसांनी नगद-नारायण गडाची यात्रा असतें त्यात नाना प्रकारचे पाच ते सात तमाशे येत असत.ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक यायचे. रोज एक नवीन तमाशा पाहायचे, खुश होऊन,मनसोक्त हसायचे, आनंदुल्हासित होऊन आपापल्या गावी परतायचे कोणी बैलगाड्या कोणी पाई तर कोणी सायकली घेऊन यात्रेला येत असत.पूर्वी तमाशे पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालायचे.खूप मनोरंजक शांततेत कायदा सुव्यवस्था पाळून मर्यादेत राहून रसीक बंधू तमाशाचा आंनद घेत असत. किंवा कधी कधी चेंगरा-चेंगरी पण होत असे.मग त्यात महापुरुषांच्या कथा, देवांच्या कथा, रामायण, महाभारत, नाटक, आणि ओघ सादर केले जातं असत.एकंदरीत तमाशा तीनही(सात्विक, रजो्गुनी, आणि तमो्गुनी ) गुणां...