धनंजय मुंडे 24 ऑक्टोंबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे याही राहणार उपस्थित
परळी प्रतिनिधी - धनंजय मुंडे दिनांक 24 ऑक्टोंबर गुरुवार रोजी 233 परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तसेच विधान परिषदेच्या सदस्या आ.पंकजाताई मुंडे याही उपस्थित राहणार आहेत .
दिनांक 22 ऑक्टोबर पासून परळी विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरू झाले आहे. विद्यमान आमदार व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गुरुवार दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 3 यादरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना साध्या पद्धतीने तसेच कोणतीही सभा न घेता आपला अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आमदार पंकजाताई मुंडे तसेच महायुतीचे घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment