परळी विधानसभेत होऊ शकतो मुंडे विरुद्ध मुंडे सामना ?
परळी विधानसभेत होऊ शकतो मुंडे विरुद्ध मुंडे सामना ?
वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून परळी विधानसभेसाठी विष्णू मुंडे इच्छुक
प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याकडे केली विष्णू मुंडे यांनी परळी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी
बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केली आहे. प्रचारासाठी वेळ कमी असल्यामुळे आता पुढील यादी लवकरच जाहीर होईल. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, जिल्हा प्रभारी प्रा.किसन चव्हाण यांच्याकडे परळी विधानसभाची विष्णू मुंडे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे हे विधानसभेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कडून जर विष्णू मुंडे निवडणुकीच्या मैदानात आले तर मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना पाहायला मिळेल.
वंचित बहुजन आघाडी पक्ष जो निर्णय घेईल तो माला मान्य आहे,असे त्यांनी सांगितले ज्यावेळी पक्षाने जो आदेश दिला आहे तो ऐकला आहे व त्या पद्धतीने आज पर्यंत काम केले आहे.
बीड जिल्ह्यातील बीड, केज,परळी येथील उमेदवार जाहिर होणे बाकी आहे. परळी विधानसभा मतदार मतदान संघातून वंचित बहुजन आघाडीचे माजी परळी तालुका महासचिव विष्णू मुंडे यांनी पक्षाची इच्छुक उमेदवारी अर्ज करून मागणी केली आहे. ते गेल्या आनेक वर्षां पासून ते काम करत आहे. परळी विधानसभा मतदान संघातून वंचित बहुजन आघाडीचे परळी तालुक्यातील टोकवाडी येथील माजी तालुका महासचिव विष्णू मुंडे यांनी देखील, मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जाऊन पक्ष श्रेष्ठशी चर्चा देखील केली आहे. परळी विधानसभेसाठी साठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व जिल्ह्याचे व राजकीय पक्षाचे लक्ष आहे.वंचित बहुजन आघाडीमुळे,स्थापन झाल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठे उलट फेर व बदल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण ? हा सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे.
Comments
Post a Comment