काढणीस आलेला कांदा पाण्यावर तरंगु लागला ; कालच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ; स्थळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी

काढणीस आलेला कांदा पाण्यावर तरंगु लागला ; कालच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ; स्थळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी:- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि‌.२२ ) काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे लिंबागणेश परीसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन काढणीस आलेला कांदा पाण्यावर तरंगताना पाहुन शेतकरी हवालदिल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी,मंडळ अधिकारी अशोक डरपे,तलाठी नेवडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या बदलीनंतर अतिरिक्त पदभार स्वीकारलेले साळवे, कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधत नुकसानीचे व्हिडिओ आणि फोटो पाठवुन तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

कालच्या पावसाने काढणीला आलेला कांदा वाया गेला ; शासनाने नुकसान भरपाई द्यावी:- आश्रुबा प्रभु कोळपे ( बेलगाव ता.बीड)( मो.नं.९३०७३४५५९२)

 गट नंबर २२१शेतामध्ये अडीच एकर कांद्याची लागवड केलेली असुन एक एकर काढणीस आलेला कांदा कालच्या मुसळधार पावसामुळे पाण्यावर तरंगत असुन जमेल तसा गोळा करत आहोत. नगर, सोलापूर याठिकाणी कांदा विक्रीसाठी पाठवायचो.परंतु काढणीवर आलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याने वजनात घट येणे, कांद्याचे आवरण सडणे रात्रभर पावसात कांदा कुजल्याने कांद्याला बाजारात भाव मिळत नाही त्यामुळे संपूर्ण कांदा पिक वाया गेले असुन शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिडीत शेतकरी आश्रुबा प्रभु कोळपे यांनी केली आहे.

अडाणी शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स ॲप वर तक्रार नोंदविणे अडचणीचेच म्हणून माझ्याशी संपर्क साधतात :- डॉ.गणेश ढवळे 
--
शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स अप माध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत आता ग्रामीण भागातील बहुतांश अडाणी शेतकऱ्यांना याप्रकारे तक्रार नोंदवता येत नसल्याने फोन वरून माझ्याशी संपर्क करतात आणि त्यानंतर मी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती कळवतो. त्यानंतर पंचनाम्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी येतात.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी