प्रा.आ. केंद्र सुलेमान देवळाचे नवीन पाणी फिल्टर कर्मचाऱ्यांनी केला लंपास

प्रा.आ. केंद्र सुलेमान देवळाचे नवीन पाणी फिल्टर कर्मचाऱ्यांनी केला लंपास

  सदर कर्मचाऱ्यावर आठ दिवसात योग्य ती कारवाई केली नाही तर 

 ५ नोव्हेंबर रोजी प्रा.आ. कें. सुलेमान देवळा येथे लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल--समाजसेवक श्री. परमेश्वर घोडके     
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : 
            बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून अस्तित्वात असणारे, आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय कोट्यातून खरेदी केलेले पाणी फिल्टर सह अनेक वस्तू कर्मचारी परस्पर लंपास केल्या . अशी लेखी तक्रार सुलेमान देवळा गावातील समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी आरोग्य विभागाकडे डॉक्टर सौ. शुभांगी पैठने /डॉक्टर शेख मॅडम यांच्याकडे केली .               
   सविस्तर माहिती अशी की, सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक आरोग्य समितीच्या निधीतून, कागदपत्रे अनेक वस्तू खरेदी केला असून, प्रथम दर्शनी कोणतेही वस्तू आज आरोग्य केंद्रात दिसत नाहीत . पाणी फिल्टर विषयी चौकशी केली असता , अशी माहिती समजली की, सदर पाणी फिल्टर दवाखान्यातील एका कर्मचाऱ्यांच्या घरी नेऊन बसवण्यात आले असून , डॉक्टर पैठणे मॅडम व कर्मचारी क्लार्क/सुपरवायझर श्री. सानप यांच्या संगमताने, दवाखान्यातील अनेक शासकीय औषधे , खांट, गादी, व अन्य औषधाची बाहेर विकी होते का? हा सुद्धा संशय व्यक्त होत असून , . सदर दोन्ही कर्मचाऱ्याची कायम अनुपस्थिती आसते . व दोन्ही अधिकाऱ्यांचा संगमत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा केंद्राचा कारभार राम भरोशे चालू असल्याचे दिसून येत आहे . रुग्णांना स्वच्छ पाणी देण्याचे पाणी फिल्टर जर कर्मचारी घरी वापरत असतील तर , जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे . या विषयी सविस्तर माहिती विचारण्यासाठी समाजसेवक श्री. परमेश्वर घोडके गेले असता,या ठिकाणी उद्धटपणाची वागणूक देत, कायद्यात तुम्हाला सुद्धा गुंतू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे या ठिकाणी दिसून आले . संबंधित पाणी फिल्टर नेनाऱ्या कर्मचारांवर डॉक्टर शुभांगी पैठणे काय कारवाई करनार ? हे पाहणं अपेक्षित आहे . 
    आरोग्य केंद्राची इमारत नवीन होणे अपेक्षित असताना सुद्धा ति न होता, साहित्य गायब करण्यास कर्मचारीसह गावातील जिम्मेदार नागरिक सक्रिय झाले . नविन ईमारत बांधकाम होण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्यारे श्री. परमेश्वर घोडके वर जर ही वेळ येने खूप खेदांची गोष्ट आहे . जर ८ दिवसात पाणी फिल्टर दवाखान्यात बसून, संबंधित कर्मचारांवर योग्य ती कारवाई न झाल्यास दि ५ नोव्हेंबर /२०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा दिलेल्या निवेदनात समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी दिला आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी