बिंदुसरेतील कालिंदेश्वर मंदिर बिल्डरांच्या पाशातून मुक्त ; सामाजिक कार्यकर्त्यांचा कालिंदेश्वराच्या चरणी अभिषेक
बिंदुसरेतील कालिंदेश्वर मंदिर बिल्डरांच्या पाशातून मुक्त ; सामाजिक कार्यकर्त्यांचा कालिंदेश्वराच्या चरणी अभिषेक:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२१ ) बीड शहरातील फुलाई नगर मोंढा परीसरातील बिंदुसरा नदीपात्रातील पुरातण कालिंदेश्वर मंदिर बिल्डरांच्या तावडीतून मुक्त व्हावे यासाठी २ वर्षांपासून सुरू केलेला लढा अखेर यशस्वी होऊन सदर गट नंबर १९३ मधिल ४६ गुंठे जमीन भोगवटदार वर्ग २ मधुन वर्ग १ मध्ये करण्याचा तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भुसुधार) प्रकाश आघाव यांचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतलेली नाही, तहसीलदारांचा अहवाल न घेताच आधिकाराचा गैरवापर झाला सदर इनाम जमिन सक्षम प्राधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय वाटणी प्रबंध असताना जमिनीचे वाटपपत्र केल्यामुळे या प्रकरणात शर्थभंग झाल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करत जुना आदेश विद्यमान उपजिल्हाधिकारी ( सामान्य) शैलेश सुर्यवंशी यांनी रद्द करण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील शासकीय अभियोक्त्यांना कळवले आहे. त्यामुळे अखेर कालिंदेश्वर मंदिर बिल्डरांच्या पाशातून मुक्त झाले असुन यानिमित्ताने आज दि.२१ सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, रामनाथ खोड,सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, बप्पासाहेब पवार यांनी कालिंदेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करून ईश्वर चरणी लिन होत आनंद व्यक्त केला.
Comments
Post a Comment