पाटोद्यातील शेकडो मुस्लिम युवकांचा आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश
पाटोद्यातील शेकडो मुस्लिम युवकांचा आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश
युवानेते सय्यद रिजवान,जाऊभैय्या शेख,जमील शेख, महम्मद चाऊस यांच्यासह शेकडो मुस्लिम युवकांनी आमदार भीमराव धोंडे नेतृत्वाखाली प्रवेश केला
पाटोदा (गणेश शेवाळे)विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाटोदा तालुक्यात राजकीय भूकंप झाला आसुन पाटोदा तालुक्यातील युवानेते सय्यद रिजवान (बिल्डर), शेख जमील, शेख जाऊभैय्या,चाऊस महम्मद यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.लक्ष्मी लॉन ता.आष्टी येथे आयोजित केलेल्या आष्टी,पाटोदा,शिरुर मतदारसंघातील अल्पसंख्यांक (मुस्लिम) बांधव यांच्या संवाद मेळाव्यात उपस्थित बांधवांना आमदार धोंडे यांनी संबोधित केले.यावेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती नियामत बेग साहेब,भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,पांडुरंग नागरगोजे, बाळासाहेब पवार,नवनाथ सानप,किशोर खोले,अँड सय्यद,सभापती लाबरुडताई, देवीदास शेंडगे,यांच्या सह जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,नगरसेवक,सरपंच,ग्रा.प.सदस्य,पदाधिकारी,कार्यकर्तेपत्रकार बांधव व अल्पसंख्याक (मुस्लिम) बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment