धम्म हा मानवतेला जोडणारा महामार्ग आहे -के.आर.पडळ गुरूजी, विभागीय सचिव,भारतीय बौद्ध महासभा

धम्म हा मानवतेला जोडणारा महामार्ग आहे -के.आर.पडळ गुरूजी, विभागीय सचिव,भारतीय बौद्ध महासभा.
बीड प्रतिनिधी- भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका बीड च्या वतीने नाथसृष्टी,अंकुशनगर बीड येथे दिनांक 20/10/2024 रोजी वर्षावास समारोह व दिक्षा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय सचिव पडळ गुरूजी, प्रमुख पाहुने म्हणून जयभीम सेना मुंबईचे अध्यक्ष नितीन मोरे, बीड जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष महालिंग निकाळजे,माजी विभागीय सचिव आदरणीय निर्सगंध, जि.बीड चे सरचिटणीस सिद्धार्थ जगझाप, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष एड. हणुमंत कांबळे, जिल्हा संस्कार अध्यक्ष प्रा. खेमाडे ,तालुकाध्यक्ष राजेंद्र ससाणे, शिरसाठ , गोपीनाथ बनसोडे ,उत्तमराव पवार,उद्योजक अशोकराव गायकवाड, आणि आषाढ ते अश्विन या काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे अविरतपणे वाचन केलेल्या सुजाताताई खेमाडे,निताताई मस्के,बबिताताई सिरसट, सरवदेताई,शुभांगी सुतार,किसनाबाई रामराव सुतार तसेच अनेक समता सैनिक ईत्यांदींच्या उपस्थितीत वर्षावास व दिक्षा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विभागीय सचिव पडळ गुरूजी यांनी बौद्ध धम्म हा समतेच्या आचरणाचा प्रगतीशील मार्ग आहे. मानवी मनाचा विकास हा धम्माचा केंद्रबिंदू आहे. धम्म हा मानवतेला जोडणारा महामार्ग आहे असे संबोधित करताना विश्वरत्न, बौद्धीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जीववरील एक अर्थपूर्ण गीत गाऊन मार्गदर्शन केले. धम्माचा मार्ग स्विकारल्याने निश्चितपणे मानवी मनाचा विकास होईल असा विश्वास बाळगून या उत्साहाच्या प्रसंगी एडव्होकेट हणुमंत कांबळे, उत्तमराव पवार, एड. मगर,किसनाबाई सुतार,सुनिल पाटोळे, वाघमारे शिवाजी, सुमित्रा वाघमारे या कुटूंबबियांनी स्वयंमस्फुर्तपणे पडळ गुरूजी यांचेकडून धम्म दाक्षा घेतली आहे. या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध सूत्रसंचालन आयु. प्रा.खेमाडे यांनी केले. आणि उत्तम आयोजन तालुकाध्यक्ष राजेंद्र ससाणे यांनी केले. आभार आणि खिर दानानंतराने कार्यक्रम समारोप करण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी