मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा-माजी सरपंच संतोष चव्हाण


आष्टी( प्रतिनिधी -गोरख मोरे ) :  
         आष्टी /पाटोदा /शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी विकासाभिमुख नेतृत्व व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पाठीशी येत्या निवडणुकीत खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आष्टी मुर्शदपुर सिदेवाडीचे माजी सरपंच संतोष भैय्या चव्हाण यांनी केले . 
 माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की, आष्टी/ पाटोदा /शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पहिल्या टप्प्यात १५ वर्ष आमदार असताना मतदारसंघात प्रचंड अशी विकास कामे केली . पाझर तलाव, वाड्या- वस्त्यांना जोडणारे रस्ते तसेच इतर अनेक विकास कामे केली आहेत . तसेच शेतकऱ्यांसाठी आष्टी ते बीड , आष्टी ते मुंबई , आणि आष्टी ते दिल्ली असे हजारों शेतकऱ्यांना घेऊन पाई मोर्चेही काढले आहेत . त्यानंतर पुन्हा वीस वर्षाच्या गॅप नंतर २०१४ मध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांची विधानसभेवर निवड झाली . पुन्हा आमदार झाल्यानंतर तर मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्ते विकास केला . त्याचप्रमाणे मतदारसंघात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा गावोगाव पोहोचली असून , गावोगावी शाळा महाविद्यालय सुरू केल्याने गोरगरिबांना शिक्षणाची आपापल्या गावातच सोय झाली . तसेच आष्टी सारख्या दुष्काळी भागात आष्टी येथे सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली असून , अशा विकासाची दृष्टी असलेल्या माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पाठीशी मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे रहावे , असे आवाहन माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी केले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी