आष्टी तालुका आम आदमी पार्टी अध्यक्ष डॉ. महेश नाथ यांचा राजीनामा

आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :  
             आष्टी तालुक्याचे आम आदमी पार्टी अध्यक्ष डॉ. महेश नाथ यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला .  राजीनाम्याचे कारण म्हणून त्यांनी वाढत्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांगितल्या .
   डॉ. नाथ यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे की, गेल्या काही काळात त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि समाजसेवेसाठी काम केले असून  , ह्या संधीबद्दल ते  अत्यंत आभारी आहेत . तथापि, सध्या त्यांच्या दंतचिकित्सक व्यवसायाच्या वाढत्या मागण्यांमुळे त्यांना पक्षाच्या कामासाठी आवश्यक वेळ आणि श्रम देणे शक्य होत नाही . 
  डॉ. नाथ यांनी पक्षाच्या निवडणूक धोरणावर देखील भाष्य केले असून  ,  त्यांनी सांगितले की, पक्षाने महाराष्ट्रात अद्याप एकही निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणुका न लढवल्यास पक्षाच्या वाढीची शक्यता कमी आहे . त्यांनी नमूद केले की, चांगले काम करणाऱ्यांना टाळले जात असून  , त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते . ज्यामुळे पक्षाच्या वाढीवर मर्यादा येत आहेत . 
  त्यांनी  असेही म्हटले आहे की, पक्षाच्या यापुढील वाढीची कोणतीही स्पष्ट दिशा नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून  , "विनाकारण काम करण्यात काही अर्थ नाही . त्यापेक्षा दुसऱ्या चांगल्या सामाजिक अथवा राजकीय कामांमध्ये वेळ दिला तर योग्य राहील," असेही त्यांनी म्हटले आहे . 
   डॉ. महेश नाथ यांनी त्यांच्या राजीनाम्याद्वारे आपल्या पदाचा त्याग करत असताना, पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी