रा.कॉ.ने दिली खोसकर यांना उमेदवारी? शिवसेनेत तीव्र नाराजी,बंडाची शक्यता ?

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघ

रा.कॉ.ने दिली खोसकर यांना उमेदवारी? शिवसेनेत तीव्र नाराजी,बंडाची शक्यता ?
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

   ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी नुकतेच पक्षात दाखल झालेले विदयमान आमदार हिरामन खोसकर यांना उमेदवारी जाहिर केल्याने खोसकर समर्थकानीं जल्लोय व्यक्त केला आहे.महायुती जागा वाटपादरम्यान हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात आल्याची चर्चा आहे.
  दुसरीकडे महायुतीचे जागा वाटप निश्चितही नसतानां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन विदयमान आमदार हिरामन खोसकर यांना उमेदवारी जाहिर होऊन ए बी फॉर्म ही देण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
  हया जागेवर शिवसेनेचा आधिकार असुन हा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला आहे.असे असतानां ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडलीच कशी जाऊ शकते असा तीव्र सवाल करत शिवसैनिकानीं नाराजी व्यक्त केली आहे. हे असेच असेल तर बंडखोरी शिवाय पर्याय नाही असा सज्जड इशाराही शिवसेनेने दिला आहे.
  दुसरीकडे आमदार हिरामन खोसकर यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी निश्चिंत केली आहे. या प्रसंगी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ हे ही हजर होते.यासह आमदार हिरामन खोसकर यांचे शेकडो समर्थक याप्रसंगी उपस्थित होते. या समर्थकानीं यावेळी जल्लोष केला.

खोसकर यांना पर्याय नाही - गोरख बोडके

    विदयमान आमदार हिरामन खोसकर यांना विकासासाठी या मतदारसंघात अन्य सक्षम पर्याय नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांनी केला आहे.
  हिरामन खोसकर हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. मागील निवडणुकीत कॉंग्रेस कडे सक्षम उमेदवार नसल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे परस्पर संमतीने कॉंग्रेस मध्ये प्रवेश करुन ते उमेदवार झाले होते.नाव कॉंग्रेस पक्षाचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस ची त्यांच्या विजयात मोठी भुमिका होती.
  आजही त्यांनी कॉंग्रेस सोडली नाही तर त्यांना ती सोडण्यास भाग पाडले गेले.त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस ला दगा दिलेला नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन पक्ष बदल ही केलेला नाही.
  आमदार हिरामन खोसकर यांनी पाच वर्षात या मतदारसंघात मोठा विकास केलेला आहे.त्यामुळे ते निश्चिंत निवडुन येणार असा दावा बोडके यांनी केला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी