आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार भिमराव धोंडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
पाटोदा (गणेश शेवाळे)विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेतेमंडळी अनेक बैठका घेत आहेत.आष्टी मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागिल अंदाजे १५ वर्षापासून
मा.आ.भिमरावजी धोंडे हे भाजप सोबत होते.२०१९ लाख १ लाखांपेक्षा अधिक मते घेऊन पराभव झाला होता भाजपची उमेदवारी देऊ असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी मा आ.भिमरावजी धोंडे यांना दिला होता.परंतु आज दि.२३ रोजी भिमराव धोंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भाजप पक्षाने भिमराव धोंडे यांचे तिकीट नाकारले तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी धोंडे यांची सुरू आहे. सध्या ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना बघून निर्णय घेतील असे संकेत दिसत आहेत.
Comments
Post a Comment