सकल ओबीसी,एस सी./ एस टी; मुस्लिम व सकलं बहुजन समाजाच्या न्याय, हक्कांसाठी..नितीन जायभाये बीड विधानसभेच्या रिंगणात

एकच पर्व... ओबीसी सर्व..
सकल ओबीसी,एस सी./ एस टी; मुस्लिम व सकलं बहुजन समाजाच्या न्याय, हक्कांसाठी..
नितीन जायभाये बीड विधानसभेच्या रिंगणात...


( चेहरा नवा, बदल हवा, विकास हवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारही हवा, संविधानाचा रक्षक हवा !)

     बीड प्रतिनिधी - गेल्या 30 वर्षांपासून सतत संघर्ष व चळवळींची पार्श्वभूमी असलेले, बीड शहरातील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लोक-नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यात नेहमीच अग्रेसर पणे काम करणारे, संघटनात्मक बांधणीचा प्रचंड गाढा अनुभव असलेले, सकल ओबीसी, एस सी./ एस टी; मुस्लिम व सर्वच बहुजन समाजांच्या तळागाळातल्या शेवटच्या घटकाच्या ही अडीअडचणी समस्यांची जाण आणि भान असलेले , फक्त बीड शहरच नव्हे तर समस्त बीड जिल्हा व बीड जिल्ह्याच्या बाहेर ही प्रचंड फार मोठा मित्रपरिवार असलेले, सर्वच लहान थोर आणि सर्व मित्र परिवाराच्या मनावर सुवृत्तीभावाने,प्रेमाने व तळमळीने अधिराज्य करणारे, सर्व जाती धर्मांच्या लोकांना हृदयापासून जपणारे, कुठल्याही भेदभावाच्या विषाचा स्पर्शही न झालेले व सर्वांना सोबत घेऊन चालणारे, कळवळा असलेले, सर्व मित्र परिवाराला हृदयापासून जपणारे व लोकप्रिय अग्रणी समाजसेवक, सर्वांचे हृदयस्पर्शी, असे बहुआयामी व्यक्तिमत्व श्री नितीनजी जायभाये हे बीड विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आदरणीय कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या काळातही भगवान सेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये फार मोलाचा व सिंहाचा वाटा उचललेले,अनेक निवडणुकांचा सक्रिय अनुभव असलेले असे नितीनभाऊ सर्वांनाच पूर्वीपासूनच सुपरिचित आहेत. अनेक निवडणुका लढवून, ग्राउंड वर काम करून त्या जिंकण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.नितीनभाऊ' हे लोकाभिमुख व कार्यतत्पर व्यक्तिमत्व आहे. सतत लोकसंपर्कात राहणे, लोकांच्या कामांसाठी, समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत राहणे,तळागाळातील शेवटच्या घटकांची व सर्व स्तरातील लोकांची मदत करत राहणे,लोकांचे गाऱ्हाणे व म्हणणे ऐकून घेणे , त्यांना योग्य तो प्रतिसाद देणे त्यांच्या असलेल्या अडचणी योग्य त्या मार्गाने दुर करणे,अशा संयमशील धोरणाचा अवलंब काम करताना करत असतात.
             बीड शहराच्या विकासाचा गेल्या 40 वर्षात शिल्लक राहिलेला अनुशेष, बीड शहराची झालेली दुरावस्था, प्रस्थापितांचा गलथान कारभार,नगरपालिकेची मरगळलेली व भ्रष्ट कार्यशैली, नागरिकांच्या मूलभूत सोयी, सुविधा या सर्वच बाबतीत अग्रणीपणे व प्रभावीपणे नितीनभाऊ काम करत आहेत.त्यांचा दृष्टिकोन दूरगामी व विकासाभिमुख आहे.तसेच बीड शहराला पुढे घेऊन जाणारा व सुंदर शहर साकारणारा आहे. त्यांनी बीड शहरातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्या तात्काळ सोडविण्यासाठी,शहरातील सुज्ञ व जागरूक नागरीकांना सोबत घेऊन"बीड शहर बचाव मंच" नावाने मंचाची स्थापना केली आहे.ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष, मागासलेला जीवनस्तर,शेतकऱ्यांच्या न संपणाऱ्या समस्या या सर्व बाबीं विषयी नितीनभाऊ यांचा दृष्टिकोन विकासाभिमुख, दूरगामी व आधुनिक पद्धतींचा स्वीकार करणारा आहे.श्री नितीनजी जायभाये यांच्या रूपाने सर्व समावेशक लोकाभिमुख पर्याय बीड विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे.बीड विधानसभा मतदार संघातील जनता प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असा त्यांनी आत्मविश्वास ही व्यक्त केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रस्थापित नेत्या पुढार्‍यांनी केलेली दुर्गती संपवण्यासाठी येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजय करा असे विनम्र आवाहन नितीनभाऊ जायभाये यांनी सर्व मतदार बंधू-भगिनींना व बीड विधानसभा मतदार संघातील तमाम मायबाप जनतेला केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी