आपली कला,परंपरा, भाषा,संस्कृती व इतिहासाच प्रबोधन करनाऱ्या 'तमाशा' ला वाचावा - डॉ जितीन वंजारे
आम्ही लहान असताना माझे वडील आम्हाला आवर्जून पाच-दहा रुपये द्यायचे यात्रेत किंवा गावात तमाशा बघण्यासाठी. माझा छोटा भाऊ आणि मी मित्रांसोबत तमाशा बघायला जायचो. कळत काहीच नव्हतं पण तमाशाने माणूस नक्कीच बदलतो कदाचित हाच त्यामागचा पूर्वजांचा उद्येश असावा.त्याकाळी हाफ तिकीट पाच रुपये असायच नंतर सात,दहा, पंधरा आणि तसच वाढत गेलं. दिवाळी झाली की पंधरा ते वीस दिवसांनी नगद-नारायण गडाची यात्रा असतें त्यात नाना प्रकारचे पाच ते सात तमाशे येत असत.ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक यायचे. रोज एक नवीन तमाशा पाहायचे, खुश होऊन,मनसोक्त हसायचे, आनंदुल्हासित होऊन आपापल्या गावी परतायचे कोणी बैलगाड्या कोणी पाई तर कोणी सायकली घेऊन यात्रेला येत असत.पूर्वी तमाशे पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालायचे.खूप मनोरंजक शांततेत कायदा सुव्यवस्था पाळून मर्यादेत राहून रसीक बंधू तमाशाचा आंनद घेत असत. किंवा कधी कधी चेंगरा-चेंगरी पण होत असे.मग त्यात महापुरुषांच्या कथा, देवांच्या कथा, रामायण, महाभारत, नाटक, आणि ओघ सादर केले जातं असत.एकंदरीत तमाशा तीनही(सात्विक, रजो्गुनी, आणि तमो्गुनी ) गुणांचा रस आहे पण काही बदमाश लोकांनी त्याला फक्त तम म्हणजे तामशी वाईट गुणांशी जोडून त्याला मलीन केल.सात्विक म्हणजे शुद्ध चांगला अतिउत्तम, रजो्गुनी म्हणजे उन्मादी, माजोरडा, अत्याचारी, अवकाळी आणि तामो्गुनी म्हणजे तामशी, खोडकर, भांडखोर, ईर्षाळु, दुःखी, सर्वांचा एकमिलाप जिथे पाहायला मिळतो तो तमाशा असतो.पूर्वी सर्रासपने बोललं जायचं 'जग तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनणाने सुधारत नाही'. होय खरंही असेल नसेल पण तमाशा म्हणजे एक चांगला प्रबोधनात्मक मनोरंजन कारण्याचा पूर्वीच्या आणि आताच्या काळातील चांगलाच मार्ग आहे.आजकालच्या टीव्ही, इंटरनेट,मोबाईल युगात व पूर्वीच्या माझा अजा- पंजा आणि त्याअगोदरच्या काळतही चालत आलेल्या या मनोरंजक प्रबोधनत्मक परंपरेला आपली कला, संस्कृती, इतिहास आणि संस्कार इत्यादीनी अलंकारीत तमाशा ला आजच्या काळात वाईट नजरेने पाहणाऱ्यांच्या तोंडावर थुकावंसं वाटत....! हे मनोरंजक शिकवण मी ह्यासाठी म्हणतो की त्यातून गण-गौळण, कृष्ण-लीला,रासलीला,ओघ,नाटक, नाच गाणे, प्रबोधनत्मक हास्य कल्लोळ, मनोरंजन आणि शेवटी तात्पर्य या सगळ्या गोष्टी नक्कीच घेण्याजोग्या असतात. जगाला दहीहंडीतील कृष्ण चालतो, साप्ताहतील काला चालतो, पंढरपूरातील वैष्णवांचा मेळा, चित्रपटातील, सिरीयल मधील महापुरुष साकारणारे सो कॉल्ड हिरो कृष वाटतात मग हे तमासगीर कलावंत पोटासाठी नाचतात अभिनय करतात खळगी भरवतात, लोकांचं मनोरंजन करतात हे का चालत नसावे? हे पण तर तेच सांगतात प्रबोधन करतात उलट टीव्ही मध्ये रिटेक घेतात दहा वेळा चुकलं तरी चालत इथे प्रत्यक्षात कराव लागत. प्रेक्षकांसमोर,समोरासमोर राहून मनोरंजन करतात तरी तमासगीरांना हीन वागणूक आणि ते पाहणाऱ्यांना तर अगदीच हीन नजरेणे पाहिलं जातं. माझ्यामते असल्या नजरा ठेवणाऱ्या,घरी एकांतात बसून ब्लु फिल्म पाहनाऱ्या सनी लिओनी च्या पिल्लाना व संस्कारीत भक्तांना कलेची चाढ शिकवलीच पाहिजे.चोवीस तास मोबाईल मध्ये नग्न आणि वाईट पाहणारे,वाईट विचार असणारे, उघडे नागडे फोटो एकांतात पाहणाऱ्या इंटरनेट भक्तांना तमाशातील गण-गौळण आणि कृष्णाची रास लीला, नाटक, ओघ, लावणी, नाच गाणे, पोवाडे, लोकगीते, आणि त्यातलं तात्पर्य का चालत नसाव.? त्यांचा बाप जाणे.अहो तमाशातील नाचणाऱ्या माता भगिनी पोटासाठी नाचतात त्यांच्या पोटाचं रोजी रोटी च साधन आहे ते,इतक्या दूरवरून येन, त्याला लागलेला ट्रान्सपोर्ट खर्च, कलाकार,गायक वादक नर्तक,मेक अप, कपडे लत्ते, अन्नधान्य,इत्यादी खर्च,सेट अप, साधन सामग्री सर्वांचा अंदाज घेतला तर हे काम म्हणावं तितकं सोप्प नाही.पण हे कलावंत तमाशा आणि मराठी भाषेच सुंदर रूप जपणायासाठी आपली लावणी जोपासण्यासाठी धडपड करतात ती कला जिवंत ठेवतात याला प्रेक्षकांनी दाद दिली पाहिजे,शंभर रुपये रोजचे पान खाऊन क्रित्येक लोक थुकत असतील मग तेच शंभर ह्या कामासाठी सत्कार्मी लावले तर त्यात त्या कलावंताच भागेल. एक भाषा जतन म्हणून आपली भागीदारी करूया चला तमाशा पाहायला जाऊया ही मोहीम राबऊयात...... प्रत्यक्ष नाटक, टीव्ही, थियटर, सिनेमा हॉल, पाहायला जसा खर्च करतो तसा या कलावंतासाठी पण खर्च करा. आणि तमाशाकडे वाईट नजरेने पाहणं सोडा. जे आपल्या बाप दाद्यानी केल, जस ही कला जपली तशी आपणही जपू त्याच उत्तरदाईत्व म्हणून आपण करूयात तमाशा वाचवूयात.....!
लेखन मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर- 9922541030
Comments
Post a Comment