राष्ट्रीय मजदुर कांग्रेस ( इंटक ) ची परळी तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार - रामधन जमाले

 

परळी प्रतिनिधी -राष्ट्रीय मजदुर कांग्रेस इंटक ची परळी तालुका कार्यकारिणी ची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार असून राष्ट्रीय मजदुर कांग्रेस इंटक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी.संजिवा रेड्डी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली असंघटित आणि संघटीत क्षेत्रातील कामगार चळवळ भक्कम आणि मजबूत करण्यासाठी तसेच कामगाराचे‌ जीवन मान उंचावून त्यांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील राष्ट्रीय मजदुर कांग्रेस इंटक ची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी लहुदास रोडे (9373082747) यांच्या शी‌ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले यांच्या वतीने करण्यात येत आहे आहे. 
दरम्यान येत्या काळात असंघटित आणि संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय मजदुर कांग्रेस इंटक डॉ जी संजिवा रेड्डी आणि डॉ कैलास भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी करणार असून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील राष्ट्रीय मजदुर कांग्रेस इंटक ची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे म्हणून ज्यांना या कामगार चळवळीत काम करायचे आहे.अशा उमेदवाराने जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले आणि लहुदास रोडे 9373082747 यांच्या संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले यांच्या वतीने करण्यात येत आहे असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी