ऑल इंडिया पॅंथर सेने तर्फे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांचा अर्ज दाखल


बीडचे राजकीय मैदान गाजवण्यासाठी नितीन सोनवणे रुपी आक्रमक पँथर उतरला आहे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांचा आज बीड विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 24 तास उपलब्ध राहणारा युवा नेता म्हणून नितीन सोनवणे यांची जिल्ह्याला ओळख आहे समाजातील सर्व जाती धर्मामध्ये सोनवणे यांचा मोठा मित्र परिवार आहे सोनवणे यांच्या उमेदवारीने बीड विधानसभा क्षेत्रातील जनतेसमोर एक चांगला उमेदवार निवडून योग्य पर्याय निर्माण झाला आहे नितीन सोनवणे यांनी शुक्रवार दिनांक 25 रोजी बीड विधानसभा निवडणुकीसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सर्व महापुरुषांना अभिवादन करून दाखल केला या प्रसंगी कावेरी जाधव, सूर्यकांत ठोकळ, दीक्षा मीर पगार, कोमल तुरुकमारे, पापाभाई, निसार शेख, सुंदर वाघमारे,रोशन धिवार,प्रशांत पायाळ, सय्यद आतार, उमेश पारिक आकाश शिंदे, व शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी व समाज बांधवांना च्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी