रिपाई एकतावादी जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढणार- शैलेंद्र पोटभरे

 


 अंबाजोगाई प्रतिनिधी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे, यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुका लढवल्या जात आहे. अंबाजोगाई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची बैठक कृष्णाई हॉटेल अंबाजोगाई येथे विधानसभेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या वेळी प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांच्या अध्यक्षस्थानी बैठक झाली. यावेळी बीड जिल्ह्यातील केज राखीव मतदार संघ व माजलगाव, परळी, गेवराई, बीड, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला यावेळी महिला मराठवाडयाच्या नेत्या कविताताई घोरपडे महिला जिल्हाध्यक्ष सीताताई भोसले डी.एस.तूपसमुद्रे जिल्हा उपाध्यक्ष बीड आबासाहेब जावळे ता.अध्यक्ष धारूर अक्षय कांबळे, ता. अध्यक्ष केज संतोष जावळे, तालुका युवा अध्यक्ष धारूर आदित्य जोगदंड, ता अध्यक्ष आनंद ओव्हाळ, ता. युवा केज अंबाजोगाई साहेबराव शिंदे,ता.अध्यक्ष परळी आशाताई मिसाळ,महिला अध्यक्ष बीड या बैठकीस व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी