बीड मधील सामाजिक व इतर समस्यान विषयी संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदार चंद्रशेखर आजाद यांना निवेदन

.



धुळे येथील सभे नंतर ऍड.खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांना बीड जिल्ह्यातील सामाजिक व इतर समस्यांविषयी निवेदना द्वारे एन एस एफ डी सी,महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ चा विकास निधी इतर योजनेत महाराष्ट्र सरकारने वळवला तो परत देऊन त्याची मर्यादा हजार कोटी पर्यंत करावी तसेच बीड रेल्वेस्टेशन ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे.व मुस्लिम समाजाच्या ग्रामीण भागातील शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र्य वसतिगृह असावे ,आणी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला ताकत देऊन या सर्व आमच्या मागण्यांचा आवाज संसदेत उठवावा अश्या मागण्या करण्यात आल्या , तद नंतर खासदार चंद्रशेखर आजाद यांनी बीड विधान सभे बद्दल चर्चा केली व बीड जिल्ह्यामध्ये आजाद समाज पार्टीचे उमेदवार उतरवण्याचे आदेश देऊन पुढील कार्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले या वेळी आजाद समाज पार्टी चे बिडजिल्हाध्यक्ष आशिष कुमार चव्हाण यांच्या समवेत केज तालुका अध्यक्ष आशिष भालेराव,बीड तालुका अध्यक्ष अशोक वाघमारे,फरहाण शेख,स्वप्नील ओव्हाळ व जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते उपस्तीत होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी