भिमशक्तीने केल्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
भिमशक्तीने केल्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी
तालुकाध्यक्षपदी सुनिल गायसमुद्रे, महासचिवपदी निखिल सिरसट, शहराध्यक्षपदी उमाकांत सिरसट आणि उपाध्यक्षपदी धिरज गायसमुद्रे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी संघटना म्हणून भिमशक्तीची सर्वदूर ओळख आहे. भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे व
डॉ अमरेंद्र विद्यागर तसेच हेमंत राष्ट्रपाल जी यांनी भिमशक्तीच्या धारूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना रितसर नियुक्तीपत्र देवून निवडी जाहीर केल्या यात धारूर तालुकाध्यक्षपदी सुनिल गायसमुद्रे, महासचिवपदी निखिल सिरसट, शहराध्यक्षपदी उमाकांत सिरसट आणि उपाध्यक्षपदी धिरज गायसमुद्रे यांची नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
धारूर येथील आंबेडकरी चळवळीतील तरूण कार्यकर्ते आणि सामाजिक व दलित चळवळी मध्ये कार्यरत आहेत. तसेच चळवळी मध्ये चांगले योगदान देणाऱ्या व बांधिलकी जोपासत गोरगरीब, गरजू लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी असणाऱ्या युवकांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली व भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव मोहनराव माने, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत बनसोडे भिमशक्ती मराठवाडा अध्यक्ष संतोष जी भिंगारे बीड जिल्हा अध्यक्ष डॉ अमरेंद्र विद्यागर धीमंत राष्ट्रपाल जी यांच्या मार्गदर्शनाखाली भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी भिमराव सरवदे यांनी रितसर नियुक्तीपत्र देवून भिमशक्तीच्या धारूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या यात धारूर तालुकाध्यक्षपदी सुनिल गायसमुद्रे, महासचिवपदी निखिल सिरसट, शहराध्यक्षपदी उमाकांत सिरसट आणि उपाध्यक्षपदी धिरज गायसमुद्रे यांची नियुक्ती केली आहे. भिमशक्तीच्या धारूर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यांतून स्वागत होत आहे. यावेळी प्रशांत वाघमारे, राकेश सिरसट, निखिल गायसमुद्रे, रजनीकांत सिरसट, सचिन वाघमारे, अक्षय वैरागे, बादल सिरसट, बबलू गायसमुद्रे, डोंगरे सर, जिजा सिरसट, अभिजीत गायसमुद्रे, कपिल सिरसट, करण सिरसट, गणेश सिरसट यांच्यासह भिमशक्तीचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भिमशक्तीच्या माध्यमातून तरूणांना संधी देणार :
खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी माझी नियुक्ती करून मोठी जबाबदारी सोपविल्यानंतर मी मागील काही महिन्यांपासून संघटना विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. बीड जिल्ह्यात भिमशक्तीची संघटनात्मक बांधणी केली. नवनविन कार्यकर्ते, युवक आणि तरूणांना संघटनेशी जोडण्याचे काम करीत आहोत, त्याचाच एक भाग म्हणून धारूर तालुक्यातील युवकांना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या आहेत. भविष्यात ही भिमशक्तीची संघटनात्मक बांधणी प्रभावीपणे करून, संघटनेच्या सर्व आजी - माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भिमशक्तीच्या माध्यमातून चळवळीला बळ व हंडोरे साहेबांना ताकद व युवकांना संधी देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
Comments
Post a Comment