आष्टी येथे आज होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- नगरसेवक अस्लम बेग
आष्टी (प्रतिनिधी गोरख मोरे ) :
आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२३ आक्टोबर रोजी आष्टी येथील लक्ष्मी लाॕन्समध्ये मतदार संघातील अल्पसंख्याक (मुस्लिम) समाज बांधवांच्या संवाद मेळावा होत आहे.या मेळाव्याचे संयोजन युवानेते अजितदादा धोंडे हे करत आहेत . या मेळाव्याला मतदार संघातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आष्टीचे नगरसेवक अस्लम नियामत बेग यांनी केले आहे .
नगरसेवक अस्लम बेग यांनी सांगितले की, माजी आ.भीमराव धोंडे हे एकमेव नेते असून , ,ते सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विकास कामे करतात . त्यांनी २० वर्षात आष्टी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केलेला असुन , आष्टी विधानसभा मतदार संघात अल्पसंख्याक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आहेत . अनेकजण शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत . त्यांच्या अनेक समस्या आहेत.त्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आज बुधवारी आष्टी येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधवांनी लक्ष्मी लॉन्स खडकत रोड आष्टी येथे सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन नगरसेवक अस्लम बेग यांनी केले आहे .
Comments
Post a Comment