ईगतपुरी त्रंयबकेश्वर मतदारसंघातुन शिवसेनेचे अशोक गुंबाडेची बंडखोरी ?

ईगतपुरी त्रंयबकेश्वर मतदारसंघातुन शिवसेनेचे अशोक गुंबाडेची बंडखोरी ?
अपक्ष म्हणुन रिंगणात उतरणार ?

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

   ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दरम्यान शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन काम करणारे अशोक गुंबाडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे. आपल्या अपक्ष उमेदवारीची त्यांनी घोषणा केली असुन, प्रचारासही प्रारंभ केला आहे.
  अशोक गुंबाडे यांनी विदयार्थी दशेपासुनच शिवसेनेच्या विदयार्थी सेनेच्या माध्यमातुन कट्टर शिवसैनिक म्हणुन कामास प्रारंभ केला.सन १९८३ ते ८८ पर्यंत गुंबाडे यांनी विदयार्थी सेनेचे काम केले.सन १९८६ पासुन त्यांनी ठिकठिकाणी शाखा खोलुन पक्षाचा विस्तार केला. आपल्या सारख्या अनेक कार्यकर्त्याच्यां बळावर राज्यात शिवसेनेची सत्ता आली.त्यानंतर मात्र सच्चा शिवसैनिक मागे पडला, व धनदांडगे लोकाचें पक्षात प्रस्थ वाढले.या लोकानां सर्वसामान्य गोरगरिब जनतेशी, आदिवासी बांधवाशी काहिही देणेघेणे नाही.यांना फक्त स्वतच्या तुंबडया भरायच्या आहेत अशा शब्दात सच्च्या शिवसैनिकांची वेदना गुंबाडे यांनी व्यक्त केली आहे.
  ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातुन आपण अपक्ष उमेदवारी करत असल्याची माहितीही गुंबाडे यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी