डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी कायम दिशादर्शक :- डॉ भारती पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी कायम दिशादर्शक :- डॉ भारती पवार
डॉ भारती पवार यांचे हस्ते बौद्धविहार, रस्ता काँक्रेटीकरण व गटारीच्या कामाचे भूमिपूजन 
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संदेशाचे अनुकरण करून मी माझ्या जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी शेवटपर्यंत काम करीत राहील असे प्रितपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.
कळवण नगर पंचायत प्रभाग क्रमांक ९ मध्ये विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांच्या निधीतून बौद्धविहारासाठी नगरसेविका भाग्यश्री शिरोडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून ५० लक्ष रुपयांचा निधी तर नगरसेविका भारती पगार यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता काँक्रेटीकरण व गटारीसाठी ४० लाख रुपये मंजूर करून घेतला आहे. या कामाचे भूमिपूजन डॉ पवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कौतिक पगार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष तेजस पगार, नगरसेविका भारती पगार, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, या प्रसंगी डॉ पवार बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ पवार म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानानुसार काम करीत आहेत. यात महामानव बाबासाहेबांची समता, स्वातंत्र आणि बंधुभाव हि जीवनमूल्य जपत सर्व घटकांच्या विकासासाठी काम केले जात आहे. विरोधक कितीही आरोप करीत असतील की, हे जातीयवादी सरकार आहे. त्यांच्या रोपाला चपराक म्हणजे बौद्धविहाराचे भूमिपूजन होय. या बौधविहाराच्या कामासाठी नगरसेविका भाग्यश्री शिरोरे यांनी वेळोवेळी माझ्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळ्ये त्यांचेही कौतुक केले पाहिजे. यापुढे शहरातील इतर कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.   
       या भूमिपूजन प्रसंगी उपनगराध्यक्ष तेजस पगार, भाजपा उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पगार, जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, महाराजा मित्रमंडळ अध्यक्ष सतीश पगार, मंडल अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हेमंत पगार, एस के पगार, हेमंत रावले, चेतन निकम, दिपक वेढणे, डॉ अनिल महाजन,सागर जगताप सुनील बस्ते, कैलास बस्ते, मोहियोद्दीन शेख, सूरज बस्ते, गोलू बस्ते, छोटू बस्ते, कुंदन बस्ते अण्णा बस्ते, सचिन बस्ते, संजय बस्ते नाना पटाईत आदींसह नागरिक उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी