दर्जेदार रस्त्यावर खोदकाम करून विद्रूपीकरण करू नये-नगरसेवक अँड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी) बीड शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून प्रमुख रस्त्या सह कानकोपऱ्या मध्ये रस्ते व नाली चे कामे झाली आहेत सदरील रस्ते अतिशय प्रशस्त आणि दर्जेदार झाले आहेत या सिमेंट रस्त्यामुळे बीड शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, यांच्या पाठपुराव्यामुळे व योगेश क्षीरसागर यांच्या सहकार्यातून तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांच्या मागणी वरून विकास कामे करण्यात आली आहेत
रस्त्याचे काम सुरु होण्या पूर्वी नगर परिषद पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग आणि नगरसेवक यांनी संयुक्त रित्या नागरिकांशी समन्वय साधून
नळ जोडणी वा दुरुस्ती साठी संपर्क साधला नियमाप्रमाणे नळ जोडणे नळदुरुस्ती करण्यात आली
परंतु काही नागरिक नव्याने झालेल्या सिमेंट रस्त्याला ब्रेकर किंवा जेसीबी मशीन ने खोदून विनापरवानगी बेकायदेशीर रित्या खाजगी प्लंबर ला हाताशी धरून नळ जोडणी करून घेत आहेत हा त्यांचा स्वार्थीपणा शहराच्या तसेच प्रभागाच्या विकासात्मक दृष्टीने विनाशक आहे
दर्जेदार रस्त्यावर खोदकाम केल्याने त्या रस्त्याचे तसेच संपूर्ण प्रभागाचे विद्रूपीकरण होत आहे याला वेळीच आवर घातला नाही तर बीड शहराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही प्रभागातील व शहरातील नागरिकांना नवीन नळ जोडणी करावयाची असल्यास त्यांनी थेट नगरपालिकेशी संपर्क साधून नियमाप्रमाणे नळ जोडणी करून घ्यावी जेणेकरून नगरपालिकेने खोदकाम केल्यास ते व्यवस्थितपणे भरून घेतले जाईल
दर्जेदार रस्त्यावर खोदकाम करून विद्रूपीकरण करू नये असे विनंती आव्हान भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे
रस्त्यावर,नालीवर ओठे करून केलेले अतिक्रमण नागरिकांनी काढून घ्यावेत
न.प ला संपर्क करून नियमाप्रमाणे नळ जोडणी करावी
काही अडचण आल्यास आपल्या नगरसेवकांशी संपर्क करावा
Comments
Post a Comment