मराठा समाजाचे मनोज जरागे पाटील यांचे गढी येथे ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज सकाळी 11-00 वाजता महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचे नेते मनोज जरागे पाटील यांचे गढी गावात आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व मनोज जरागे पाटील यांनी गढी येथील ग्रामस्थांना मराठा समाजापुढे मराठा आरक्षणासाठीची पुढची दिशा आणि दशा कशी आहे हे मराठा समाजापुढे आपले विचार व्यक्त करताना असे ते म्हणाले यावेळी गढी गावातील महिला व पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गढी गावातील युवकांनी खूप सहकार्य केले या वेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मनोज जरागे पाटील यांचे स्वागत करण्यात आले
Comments
Post a Comment