स्वच्छतेसाठी 'एक तारीख एक तास उपक्रम 'अंतर्गत जिल्हा परिषद शाळा परीसरात स्वच्छता मोहीम

स्वच्छतेसाठी 'एक तारीख एक तास उपक्रम 'अंतर्गत जिल्हा परिषद शाळा परीसरात स्वच्छता मोहीम:- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास उपक्रम 'स्वच्छता पंधरवडा -स्वच्छता सेवा या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी रविवार १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरिक तसेच ग्रामीण भागामध्ये एक तारीख एक तास या उपक्रमांतर्गत स्वच्छता साफसफाई करून अभियानात सहभागी व्हावे या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेशकरांनी लिंबागणेश येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झुडपे विळा आणि कोयता यांनी कापण्यात आली.तसेच तणनाशके फवारणी करण्यात आली.शाळेचा परीसराची झाडुने स्वच्छता करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब हंगे, सहशिक्षक अमर पुरी,भरत चौरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी, सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव वाणी, विक्रांत वाणी, संतोष भोसले, कालिकादेवी वरीष्ठ महाविद्यालय शिरूर (कासार) कर्मचारी शिवाजी रणखांब, सुंदर जाधव, संतोष भोसले, रामदास मुळे, सचिन आगवान,आर्यन फाऊंडेशनचे राम फाळके आणि डॉ.गणेश ढवळे सहभागी झाले होते.

दत्तक शाळा व समुह शाळा योजना विरोधात ग्रामपंचायत ठराव
---
याचवेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी ऊद्या दि.२ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत सरकारच्या दत्तक शाळा व समुह शाळा योजनेमुळे गोरगरीबांना शिक्षणाची दारे बंद होणार असुन याविरोधात ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन प्रशासनाला पाठवण्याचे एकमत झाले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी