परळी येथील राजू जगतकर ची युरोप मधील डेन्मार्क देशात अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड

बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

परळी येथील राजू जगतकर ची युरोप मधील डेन्मार्क देशात अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड
बीड - सध्या मुंबई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापक म्हणून ओळख असलेले आणि परळी बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र यांची युरोप मधील डनमार्क या अतिप्रगतशील देशांमध्ये मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत 14 ऑक्टोंबर पासून ते 05 नोव्हेंबर या कालावधीसाठी उच्च प्रशिक्षणासाठी राजू श्रावणराव जगतकर यांची निवड करण्यात आली आहे. अशा अतिउच्च प्रशिक्षणासाठी निवड झालेले हे महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व आहे.

राजू श्रावणराव जगतकर हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जगतकर गल्ली येथे वास्तव्य करतात, संपादक बालाजी जगतकर यांचे ते छोटे बंधू आहेत. यापूर्वीही कॅनडा, ऑस्ट्रेलिया,कतार, अमेरिका या देशांमधील मेट्रो रेल्वे मध्ये चांगल्या पदावर यांची नियुक्ती झाली होती मात्र त्या ठिकाणी न जाता आपलं करिअर हे भारतातच करायचं आणि ते घडवायचं या विचारातून पहिले दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये त्या कार्यरत होते त्यानंतर आज ते मुंबई मेट्रो रेल्वे येथील उच्च स्तरावरील मॅनेजर या पदावर आहेत मात्र नुकत्याच सिलेक्शन स्टीम्स मध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण पदांसाठीचे प्रशिक्षण यामध्ये राजू जगतकर यांची निवड झाली आहे. यासाठी युरोपमधील डनमार्क या प्रगतशील देशांमध्ये मुंबई मेट्रो अंतर्गत 14 ऑक्टोबर पासून ते पाच नोव्हेंबर या कालावधीसाठी उच्च प्रशिक्षणासाठी राजू श्रावणराव जगतकर यांची निवड करण्यात आली आहे यामुळे बीड जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जातोय बीड जिल्ह्यातील पहिलाच असा व्यक्ती आहे की ज्याला अनेक देशातील ऑफर्स असतानाही त्या भारतातच राहून आपलं करिअर करायचे हे देह निश्चित केलं होतं यातूनच आपल्या बुद्धीच्या बळावर मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत कार्यरत राहत आपलं कौशल्य दाखवत संधी मिळत गेला आणि यातच आता मेट्रो रेल्वेच्या च्या माध्यमातून अतिउच्च शिक्षणासाठी तो युरोपमधील डनमार्क या ठिकाणी उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याने बीडच्या परळीत जल्लोषही साजरा केलाय. यावेळेस सर्व स्तरातून राजू जगतकर यांचे कौतुक आहे केला जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी