रिपाइं(A)च्या वर्धापन दिना निमित्त हैद्राबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्याने उपस्थित रहावे-डॉ.नरेंद्र जावळे
पाटोदा (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या व सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.३ आक्टोबर २०२३ रोजी हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रिपाइं(A)च्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हैद्राबादला होणार्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. नरेंद्र जावळे रिपाइंचे पाटोदा तालुका अध्यक्ष यांनी केले दि.३आक्टोबर २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथील नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळ एक्झिबीशन मैदानात राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले साहेब व रि.पा. ई.चे युवा प्रदेक्ष अध्यक्ष मा.पप्पूजी कागदे साहेब यांच्या सह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी च्या प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच पक्षाच्या वतीने अनेक महत्त्वापूर्ण ठराव घेतले जाणार आहेत.तरी पाटोदा येथील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी हैद्राबाद येथे होणाऱ्या या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे आशे आवाहन रिपाइंचे पाटोदा तालुका अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जावळे यांनी केले आहे
Comments
Post a Comment