उद्या होणार्या स्वच्छता अभियानास पाटोदा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे नगराध्यक्ष राजु भैय्या जाधव यांचे आवाहन
पाटोदा (गणेश शेवाळे)भारत सरकार यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ते ०२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत“स्वच्छता पंधरवडा स्वच्छता अभियान देशभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी एक तास श्रमदान करून एक तारीख - एक घंटा (एक तारीख - एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे आयोजन देशभरात केले आसुन.पाटोदा शहरात ही स्वच्छता अभियान आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पाटोदा शहरात स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले असून पाटोदा नगरपंचायत स्वच्छता अभियान रुपरेषा खालील प्रमाणे आहे. सकाळी 9.00 वाजता बुद्ध विहार भीमनगर ते जुन्या पोलीस स्टेशन मार्गे काळा हनुमान मंदिर,राम मंदिर,श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर,चाऊस मज्जित तसेच श्री संत सेना महाराज मंदिर,श्री संत सावता महाराज मंदिर, सावता महाराज चौक, मरकज मज्जित,क्षेत्र भामेश्वर मंदिर,श्री संत भगवान बाबा चौक, अण्णाभाऊ साठे चौक, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,ते नगरपंचायत कार्यालया पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा स्वच्छता अभियानाचा मार्ग असून या स्वच्छता अभियान कार्यक्रमास पाटोदा शहरातील नागरिकांनी संकाळी 9.00 वा.बुद्ध विहार भीमनगर पाटोदा येथे उपस्थित रहावे आशे आवाहन पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांनी केले आहे
Comments
Post a Comment