मौजे धानोरा येथे मा, शिवराजे ग्रुप /मा, हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
आष्टी ( प्रतिनिधी- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवा निमित्त आज २६ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी जनता विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सदर शिबिर सकाळी १० ते ५ या वेळात संपन्न झाले .
या रक्तदान शिबिरामध्ये ५० नव तरुणांनी रक्तदान केले . सदर मा. शिवराजे ग्रुप/मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप अनेक वर्षापासून गणेश उत्सव कालावधीमध्ये सामाजिक उपक्रम राबवत असून , इतर खर्चाला फाटा देत समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहेत .
या रक्तदान शिबिर प्रसंगी मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप - या दोन्ही ग्रुपचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , व सर्व सदस्य याप्रसंगी सहभागी झाले होते .
गणेश उत्सव काळामध्ये इतर खर्चाला फाटा देऊन समाज उपयोगी उपक्रम राबवावेत , असे आवाहन जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री . गव्हाणे. यु .आर सर यांनी रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना सांगितले . तालुक्यातील प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी मा. शिवराजे ग्रुप /मा. हिंदवी स्वराज्य ग्रुप या गणेश मंडळांचा आदर्श घ्यावा असे आवाहन भव्य रक्तदान शिबिरा प्रसंगी बोलताना केले .
Comments
Post a Comment