ई - पिक पहाणीची मुदत पुन्हा वाढली, आता करता येणार या तारखेपर्यंत
ई - पिक पहाणीची मुदत पुन्हा वाढली, आता करता येणार या तारखेपर्यंत
शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घ्यावी - जिल्हाधिकारी मुंडे
बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे
बीड जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे. असल्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी म्हटले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पञकात पुढे म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई - पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरचे ई-पीक पहाणी शेतकऱ्याद्वारे स्वंय प्रमाणीत मानण्यात येणार आहे. त्यापैकी किमान १० टक्के तपासणी तलाठी यांचेमार्फत करण्यात येणार असून ४८ तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरच्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह तीन घटक पीके नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच संपुर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी अॅप मध्येच शेतकऱ्यांकरिता मदत बटन देण्यात आलेले असून मदत कक्ष क्रमांक ०२२-२५ ७१२ ७१२ या दुरध्वनी क्रमांकावर देखील आपल्याला ई-पीक पाहणी बाबत काही अडचणी व शंका असल्यास संपर्क करुन आपल्या अडचणीचे निरसन करुन शकतात.
तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
खरीप हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी करण्यासाठी दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगाम २०२३ मध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
बीड जिल्हयात सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी तसेच सर्व शेतकऱ्यांनी १०० टक्के भाग घेवून ई-पीक पहाणी पुर्ण करावी असे अवाहन बीड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment