भिमनगर येथील सुगंध कुटी बुद्ध विहारात जगतकर परिवाराच्या वतिने बौध्द पोर्णिमा साजरी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
भिमनगर येथील सुगंधकुटी बौद्ध विवाहारात जगतकर कुटुंबाच्या वतिने बौध्द पोर्णिमा निमित्ताने बौध्द,धम्म व संघ वंदना व भदंत यांचे धम्म प्रवचन व खिरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तथागत गौतम बुद्धाचा मार्ग हा जगाच्या कल्याणाचा मार्ग असून त्यांची शिकवण आत्मसात केल्यास सर्वांचे कल्याण होईल असे मत ज्येष्ठ नागरिक प्रकाश अण्णा संभाजी जगतकर यांनी व्यक्त केले.
सुगंधकुटी बौद्ध विवाहारात भिमनगर जगतकर गल्लीतील बौद्ध उपासक,उपासिकांच्या वतिने प्रत्येक रविवारी बौध्द वंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येथे आज बौध्द पोर्णिमेच्या पावन दिनाची धार्मिक सेवा देण्याच येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश अण्णा संभाजी जगतकर यांच्या परिवाराला मिळाले. कपिल प्रकाश जगतकर राहुल प्रकाश जगतकर गंगाधर प्रकाश जगतकर व डॉ. रवींद्र प्रकाश जगतकर यांच्याहस्ते तथागत गौतम बुध्द व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.जगतकर परिवाराच्या सामूहिक कल्पनेतून बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंते धम्मबोधी यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली.बौध्द,धम्म व संघ वंदना घेण्यात आली असुन त्यानंतर खिरदान कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रकाश अण्णा संभाजी जगतकर म्हणाले कि, जगात दुःख आहे. या दुःखातून मुक्तीचा मार्ग बुद्धांनी त्यांच्या धम्म सांगितला आहे. या जगात कुठलीच गोष्ट स्थिर नाही. म्हणून प्रत्येक माणसाने सुखी जीवन जगण्यासाठी धम्माचे आचरण आवश्यक आहे. यावेळी भिमनगर,जगतकर गल्लीतील बौध्द उपासक उपासिका व लहान मुल मुली मोठ्या संख्येने सहभागी होते.
Comments
Post a Comment