महंत तुकाराम महाराज भारती यांच्या नियोजनातून विराट सोहळा संपन्न
संत ईश्वर भारती बाबांनी हरी भजनातून जग धवळून काढले - महंत शिवाजी महाराज नारायणगडक
महंत तुकाराम महाराज भारती यांच्या नियोजनातून विराट सोहळा संपन्न
संत ईश्वर भारती महाराज जयंती ८३ पुण्यतिथी संपन्न..
बीड - दि २५ (प्रतिनिधी) संत ईश्वर भारती बाबांनी हरी भजनातून जग ढवळून काढले. जनसामान्यांच्या उद्धार करण्यासाठीच संत ईश्वर भारती महाराजांचा जन्म झाला असे प्रतिपादन श्री ह भ प महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी केले. ईश्वर भारती महाराज यांच्या ८३ व्यां पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर येथे आयोजित काल्याचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव आनंद भारती, महंत तुकाराम महाराज भारती ,महंत हरिहर महाराज भारती, शिवाजी महाराज येवले,हनुमान टेकडी महाराज, मारोती महाराज चोरमले, प्रा नाना महाराज कदम,सिद्धश्वर महाराज बागलांने, ओमकार महाराज कागदे, जनार्दन महाराज बांगर, रंजीत महाराज शिंदे योगेश महाराज जोगदंड सुरेश महाराज जाधव लोखंडे महाराज यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सारिका क्षीरसागर, भाजप नेते चंद्रकांत फड, पंचायत समिती सदस्य बबनराव माने यांच्यासह परिसरातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
विसाव्या शतकातील महान संत विभूती ईश्वर भारती महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या भव्य पुण्यतिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगदनारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी संत नामदेव महाराज यांच्या गवळणी पर अभंगावर सुंदर चिंतन मांडले.
नंदाच्या घराला! मज नेई गोकुळा!!
माया उपजली तेथे ! ठेवी मज आणि येथे!!
म्हणाती असे रक्षपाळ ! ते म्या मोहिले सकाळ!!
अच्छाधित रूप ! नामा म्हणे माझा बाप!!
या अभंगावर चिंतन मांडताना महाराज म्हणाले की
या अभंगातून स्वतः भगवान भक्ताकडे जाण्याची इच्छा करतो कारण देवालाही भक्ताशिवाय करमत नाही. तसं पाहिलं तर देव हा न्यायाधीश आहे संत हे वकील आहेत तर जीव हा आरोपी आहे. जीवाचा उद्धार करण्यासाठी संत हे पृथ्वीतलावरती अवतार घेतात आणि जीवाचा उद्धार करतात. ईश्वर भारती महाराजांनी अनेक भोळ्या भाबड्या लोकांना परमार्थाला लावले. लाभाशिवाय प्रेम करणारी संत जमात आहे.माणसाला माणूस म्हणुन संतांचे साहित्य घडवते. साधू आणि संतांनी देखिल खेळी मेळीचे वातावरणच असावे. द्वैत नसावं तोच खरा परमार्थ आहे.साधू संतांचा अवतार जड जीवनाचा उध्दार करण्यासाठीं आहे..भक्तीची रेंज येण्यासाठी देवस्थान आहेत..अंतकरण गोकुळ केलें तर देव स्वतः येवून राहतो. असेही महाराज म्हणाले. यावेळी लहान मुलांना संस्कार द्या आपली संस्कृती त्यांना कळली पाहिजे तसेच व्यसनापासून दूर राहा असा मोलाचा संदेश दिला..
यावेळी श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान परिसरातील शेकडो टाळकरी मंडळींची उपस्थिती होती
1)श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान हे आध्यात्मिक शक्ति केन्द्र आहे. या ठिकाणीं नत मस्तक झाले की ऊर्जा मिळते. ईश्वर भारती बाबांपासून ग्रामीण भागातील लोकांना अध्यात्मिक शांती देण्याचे काम या संस्थांनी केला आहे आणि ते निरंतर सुरू आहे. या ठिकाणी दर्शन व प्रसाद सेवनाचा लाभ मिळाला हे परम भाग्य अशी भावना डॉ.सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
2) संत ईश्वर भारती महाराज आणि श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान खूप मोठे अध्यात्माचे काम करत आहे. या संस्थांचा भक्त म्हणून गेल्या अनेक दिवसापासून सेवा करण्याचा योग मला मिळत आहे. इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं. आज या ठिकाणी कीर्तन ऐकून आत्मिक समाधान मिळाले. संस्थांच्या विकासाच्या कामात कायम सोबत आहोत असे भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.
Comments
Post a Comment