डॉ. दीपाताई क्षीरसागरांकडून श्री.खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात स्वच्छता
महात्मा गांधी जयंती निम्मित हिरकणी ग्रुप बीड तर्फे स्वच्छता अभियान
बीड दि.०१ (प्रतिनिधी) हिरकणी ग्रुप बीड यांच्याकडून श्री. खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात महात्मा गांधी जयंती निम्मित आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत माजी नगराध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी सहभागी होत परिसराची स्वच्छता केली.
महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशात ०१ ऑक्टोंबर रोजी ०१ तास स्वच्छता श्रमदान अभियान राबविण्यात आले. त्यानुसार बीड शहरात देखील हे अभियान राबविण्यात आले. हिरकणी ग्रुप बीड यांच्याकडून श्री.खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवत स्वच्छता केली. यावेळी त्यांनी सहभागी झालेल्या महिलांशी स्वच्छतेसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, देशातील प्रत्येक नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान मोहीमेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. मात्र कोणतीही मोहीम लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने यामध्ये सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण स्वच्छतेला जास्त महत्व दिले पाहिजे. अनेक महापुरुषांनी त्यांच्या जीवनात स्वच्छतेला महत्व दिले आहे. स्वच्छता न ठेवण्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, कचरा इतरत्र न टाकता कचरापेटीमध्ये टाकून एक प्रकारे सेवा करू शकतो.आपण आपले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणेच आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला तर आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन आणि जबाबदारीने स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे की आपणही आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपला सहभाग देण्याचे आवाहन देखील माजी नगराध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी याप्रसंगी केले.
यावेळी या स्वच्छता अभियानात हिरकणी ग्रुपच्या सर्वेसर्वा सौ. हेमाताई विभुते,सविता जैन, मनीषा कुलकर्णी,सुरेखा सरोदे, प्रविणा पोकळे, मीना मस्के, कविता देशमुख,वैशाली नहार,गीता अग्रवाल,पूजा अग्रवाल, कविता हांगे, प्रतिभा तांबट, कराड ताई, सुरेखा औटी, पूजा वाडेकर, अनिता शिंदे यांच्यासह अनेक महिला भगिनींनी मिळून परिसराची स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.
Comments
Post a Comment