इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अनुभवला निवडणूक प्रक्रियेतला आनंद


शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक श्री गवाजी बळीद यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक श्री तुकाराम भगतसर व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय गीतखने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत वर्गनायक निवडीचा आनंद लुटला. वर्गनायक पदासाठी कु गायत्री दिवटे, चि श्रेयस गायके , तिर्थराज भिसे व कैवल्य गायकवाड या चार विद्यार्थ्यांनी उमेदवारी केली होती.एक दिवसाचा कालावधी प्रचारासाठी देऊन दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान कक्ष तयार करून मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली .
       मतदान अधिकारी म्हणून इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी कु . स्वामिनी जाधव , चि प्रथमेश नेमाने , यश तेलोरे यांनी मतदार यादी , मतपत्रिका देणे , डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावणे , मतदान कक्षात जाऊन मतदान पेटीत पत्रिका मतदान करून टाकण्यास सहकार्य करणे आदि प्रशासकीय कामकाज पार पाडले .
          प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तासाभराच्या अवधीनंतर प्रत्यक्ष मतदान मोजणी सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समक्ष मतमोजणी करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर कु . गायत्री दिवटे व चि. तिर्थराज भिसे यांना समान मते मिळाल्याने छोट्या बालकाच्या हाताने चिठ्ठी उचलण्यात येऊन चि.तिर्थराज भिसे याच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्याला वर्गनायक म्हणून तर कु. गायत्री दिवटे हिस उपवर्गनायक म्हणून घोषीत करण्यात आले. यावेळी अत्यंत जल्लोषात घोषणा देऊन हात मिळवत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी दोघांचे अभिनंदन केले.
         दुसऱ्या क्रमांकाची मते श्रेयस गायके यास पडल्याने त्यास अभ्यासमंत्री तर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या कैवल्य गायकवाड यास स्वच्छतामंत्रीपदी सर्वानुमते निवडण्यात आले. कु.हिंदवी मडके व कु. संचिता जाधव व शिवम गायकवाड यांना स्विकृत सदस्य म्हणून निवडण्यात येऊन त्यांच्याकडे अनुक्रमे खेळमंत्री, प्रकल्पमंत्री व उपक्रममंत्री म्हणून महत्वाच्या पदांचा कार्यभार सोपविण्यात आला.
         या उपक्रमाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्रीम तृप्तीताई कोलते मॅडम ,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. शैलजा राऊळ मॅडम , श्री एकनाथ पटेकर साहेब , बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ शंकर गाडेकर साहेब , चापडगाव केंद्राचे प्रमुख श्री सुरेंद्र गिऱ्हे साहेब , मुख्याध्यापक श्री तुकाराम भगत सर , श्रीम.अलकाताई साळवे , सुनिताताई रोडे, सिंधुताई गमे, वर्षाताई कांबळे मॅडम, श्री संजय गीतखने , श्री नीळकंठ आमले सर आदिंसह शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

 शब्दांकन - कवी गवाजी बळीद
        जि.प.प्रा.शाळा चापडगाव,
         ता.शेवगाव, जि. अहमदनगर

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी