२८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस कागदोपत्रीच साजरा करु नये:- डॉ.गणेश ढवळे

 


बीड:- २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन माहिती अधिकार अधिनियम कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती, विविध उपक्रम राबवत जास्तीत जास्त नागरीकांमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी जनजागृती करुन साजरा करण्यात यावा केवळ कागदोपत्रीच साजरा करण्यात येऊ नये तसेच माहिती अधिकार दिवस साजरा न करणा-या शासकीय कार्यालयावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

सविस्तर माहितीस्तव
-----
 शासन निर्णय क्रमांक केमाअ /२००८ /प्र.क्र.३७८/सहा दि.२० सप्टेंबर २००८ अन्वये दि.२८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी " आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन" म्हणून साजरा करण्याचे शासन आदेश आहेत.यादिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती , विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवुन त्या जास्तीत जास्त नागरीकां पर्यंत पोहचवण्याचा शासनाचा उपक्रम आहे. त्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावरील शालेय शिक्षण विभाग, महाविद्यालये, शाळा शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते तसेच इच्छुक गटाकरीता माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध वक्तृत्व, भित्तीपत्रके इत्यादी सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करणे अपेक्षित आहे.त्यापद्धतीने उपक्रम साजरे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

कागदोपत्रीच माहिती अधिकार दिन साजरा करणारांवर शिस्तभंगाची कारवाई करा
---
दरवर्षी बहुसंख्य शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन शासन नियमानुसार उपक्रम न साजरे करता केवळ कागदोपत्रीच साजरे केल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे
कोणत्या कार्यालयाने कशाप्रकारे माहिती अधिकार दिन साजरा केला याचे प्रत्यक्ष पुरावे माहिती आधिकारात मागितले जातील व ज्या कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा केला जाणार नाही .त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी