नाकर्ते राज्यकर्ते आणि निष्क्रिय मुख्याधिकारी नगरपरीषद यांच्या निष्क्रयतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात :- डॉ.गणेश ढवळे

---
बीड:- बीड शहरातील अमृत अटल पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजनेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करूनही योजना पूर्ण न झाल्याने तुंबलेल्या नाल्यांची केवळ कागदोपत्रीच सफाई करत शासकीय निधी घशात घातल्याने गटारीतील पाणी मुख्य रस्त्यावर येऊन रस्त्यांना गटारीचे स्वरूप आले असून सत्ता भोगलेल्या राजकीय पुढारी आणि मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे या बीड शहरातील भिंतीवर स्वच्छ बीड व सुंदर बीड द्वारे जनतेची दिशाभूल करण्यात मग्न असुन  ढिसाळ नियोजनामुळे बीडकरांचे आरोग्य संकटात सापडले असुन शहरातील बहुतांश बाजारपेठ परीसरात तसेच केएसके महाविद्यालय,माळीवेस, जालना रोड,शाहुनगर आदी.प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी गटारीतील घाण पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असुन पादचारी, दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. पसरलेल्या अस्वच्छतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले असुन मोठ्या रोगराईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे.

पुढा-यांची श्रेयवादासाठी चढाओढ, रखडलेल्या योजनांची जबाबदारी झटकतात
---
बीड शहरांमध्ये खंडीभर पुढारी असुन केवळ अमृत अटल योजना अथवा भुयारी गटार योजना आम्ही आणली म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मिडियावर समर्थकांकडुन गाजावाजा केला जातो.मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही रखडलेल्या योजनांची जबाबदारी कोणताही पुढारी घेताना दिसुन येत नाही.

 मुख्याधिकारी नीता अंधारे भिंतीवर स्वच्छ व सुंदर बीड मग्न, ढिसाळ नियोजनामुळे  बीडकरांचे हाल
---
बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे नागरीकांना पाणी, स्वच्छता , नाल्यांची साफसफाई आदि. मुलभूत सुविधा देण्यास सपशेल अपयशी ठरल्या असुन जागोजागी घाणीचे साम्राज्य, ओव्हरफ्लो कचराकुंडी, मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास,१५ दिवसाआड पाणी आदि गोष्टींकडे लक्ष न देता केवळ भिंती रंगवुन त्यावर स्वच्छ बीड आणि सुंदर बीड यातच धन्यता मानत आहेत त्यामुळे बीडकरांचे हाल होत आहेत.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी