बिंदुसरा प्रकल्पावरती स्वच्छता अभियान राबवुन रोहित धुरंधरे यांचा वाढदिवस साजरा.

बिंदुसरा प्रकल्पावरती स्वच्छता अभियान राबवुन रोहित धुरंधरे यांचा वाढदिवस साजरा.

तलावा किनारी घानिचे साम्राज्य पाहता; रुग्ण मित्र फाऊंडेशनचा नावलौकिक उपक्रम.
बीड प्रतिनीधी :
बीड शहराला पाणी पुरवठा केला जाणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या परीसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. व अशातच गणपती विसर्जन झाले त्यावेळी बीड शहरातील अनेक गणपती विसर्जन याच तलावात झाले. सद्य स्थितीत पाहिले तर या तलावाभोवती प्लास्टिक, कचरा, मोठ्या प्रमाणात तलावाच्या काठावर पडलेल्या अवस्थेत आहे. इथुनच संपूर्ण बीड शहराला पाणी पुरवठा होत असतो. मात्र सर्वत्र प्लास्टिक, कचरा पाहता हा तलाव स्वच्छता करण्याचे काम प्रशासनाने करायला हवे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व परीस्थितीला पाहता रुग्ण मित्र सामाजिक फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित धुरंधरे हे नेहमीच आगळा वेगळा उपक्रम राबवत असतात, त्यांनी आपला वाढदिवस पाली येथील बिंदुसरा प्रकल्पावर स्वच्छता अभियान राबवुन करण्याचे ठरवले. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी वाढदिवस दिवशी रुग्ण मित्र सामाजिक फाऊंडेशन बीड येथील टिमने व रोहित धुरंधरे यांनी परीश्रम घेऊन संपुर्ण तलावाच्या काठावरील सर्व प्लास्टिक, कचरा, प्लास्टिक पाणी बाॉटल, कॅरी बॅग, असा साचलेला भरमसाठ कचरा गोळा करुन तलावाभोवती स्वच्छता अभियान राबवुन तो कचरा नास्तानामुद केला. व त्यांनी एक आदर्श मय कार्य करुन दाखवले आहे. आता उर्वरित राहिलेला कचरा व घाण बीड प्रशासनाने काढायला हवा अशी बीड शहरातील नागरीकांतुन चर्चा होत आहे. या अभुतपुर्व अशा संकल्पने मधुन मानवतेला एक आगळा वेगळा संदेश रुग्ण मित्र रोहित धुरंधरे यांनी प्रशासनाला व शहर वासियांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची जिल्ह्यात सर्वत्र वाह वाह होत आहे. यावेळी उपस्थित रुग्ण मित्र सामाजिक फाऊंडेशन चे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष लक्षम्ण भाऊ पाटोळे सर, सामाजिक कार्यकर्त्या चव्हाण मॅडम, यांनीही स्वच्छता अभियान मोठे परीश्रम घेतले यावेळी अमूता मॅडम, दै. झुंजार नेताचे उप संपादक आत्मारामजी ओव्हाळ सर, विनोद चांदणे, लोकमतचे पत्रकार शिवप्रसाद शिरसाट सर, दैनिक न्याय टाइम्सचे संजय कुलकर्णी, यश दुनघव, व आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी