स्वाभिमानी नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-नागेश बोराडे
आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :
लढाई वंचिताच्या सत्तेसाठीच्या महासभेचे आयोजन. आदरणीय श्रध्देय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये दिं ११ आॅक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठिक २:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे होत आहे सबंध बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे अँड बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेस संबोधित करणार आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा आणि दशा बदलाचे काम या महासभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे तळागळातील समूहांने या लढाईत स्वईच्छेने उपस्थित राहुन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत आणि लढाई वंचिताच्या सत्तेसाठी महासभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातुन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वृध्द तरुण महिला यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते नागेश रूपेश बोराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .
Comments
Post a Comment