केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते कळवण येथे सुजज्ज 100 खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

कळवण येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय परिसरात बांधलेल्या ई सी आर पी 2 अंतर्गत 100 खाटांचे अद्यावत अश्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले.
या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि लोकांना मदत करण्यासाठी इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे,सुसज्ज अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक असलेली यंत्रसामुग्री रुग्णालयात उपलब्ध झाली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गरीबातला गरीब रुग्णाच्या विभागाची व्यवस्थाही वातानुकूलित केली आहे.गरीब, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असो सर्वांना उपचार एकाच पद्धतीनं मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
यावेळी शंकरराव वाघ,दिपक खैरणार, रमेश थोरात, सुधाकर पगार,विकास देशमुख,निंबा पगार,सुनील पवार ,डॉ. अनिल महाजण, नंदु कुमार खैरणार,सतीश पगार,Sk पगार,संदिप अमृतकार,राजेंद्र ठाकरे,गोविंद कोठावदे, सोनाली जाधव,कुष्णकुमार कांबळसकर,दिपक वेढणे,हेमंत रावले,काशिनाथ गुंजाळ मोतीराम वाघ,दादा मोरे, दिनकर आहेर,प्रकाश कडवे,मोहन चौधरी,भूषण देशमुख,चेतन निकम,गौरव पाटील,सुनिल खैरणार,प्रभाकर निकम,बबन वाघ, मनोहर बोरसे,प्रभाग शिवले,संदिप पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासीम शेख सह आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी