पालवण ते लिंबागणेश १३ कोटींच्या रस्त्याची दुर्दशा; बेशरम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेशरमांची झाडे लाऊन निषेध ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच?
पालवण ते लिंबागणेश १३ कोटींच्या रस्त्याची दुर्दशा; बेशरम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेशरमांची झाडे लाऊन निषेध ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच? :- डॉ. गणेश ढवळे             लिंबागणेश (दि. ०४) :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवण चौक ते लिंबागणेश या २४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर तब्बल १२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असलेल्या मदन मस्के कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे डांबर, वाळू-खडीचे चुकीचे प्रमाण वापरल्याने रस्ता काही महिन्यांतच उखडला आहे. या कंपनीच्या हायवा ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत असल्याने रस्ता खचला असून, जागोजागी खोल खड्डे आणि भगदाड पडले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुर्दशेबद्दल संतप्त ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली अनो...