गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख
परळी ( प्रतिनिधी)-परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधारी व विरोधी एकमेकांवर करीत आहेत. प्रचारातील एका सभेत आ. धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधकांवर विविध आरोप केले. यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडण्यापासून ते दवाखान्याचा खर्च करण्यापर्यंत आरोप केले . यालाही त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार व नेते व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .संध्या दीपक देशमुख यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा जनतेसाठी आपण काय केले परळीच्या विकासासाठी मंत्री पदाचा मिळालेला दिवा किती लावला. मी तुमच्या एका दमडीचाही लाभार्थी नाही. याउलट मीच तुम्हाला विधानसभेसाठी अर्थसहाय्य केले आहे. त्यावेळी तुमचा पराभव झाला होता. गोळ्या बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला असे ते म्हणाले. तसेच त्यांनी माझे घर शेतीवर चालते मी कुठलाही कॉन्ट्रॅक्टदार वगैरे नाही असेही त्यांनी माध्यमातून आ. धनंजय मुंडे यांना सुनावले. आतापर्यंत आ.धनंजय मुंडे यांनी कोणत्याच कार्यकर्त्याला स्टॅन्ड केले नाही याऊलट ज्यांचे चांगली ऐपत होती, ती सुद्धा आ.धनंजय मुंडे यांच्या वागण्यामुळे गेली आहे. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत ,यात कुठलेही तथ्य नाही.
दरम्यान माध्यमाने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली. आ.धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी राजश्री मुंडे प्रचारात उतरलेल्या आहेत, काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना दीपक देशमुख म्हणाले की, मुंडे परिवारामध्ये सर्वात मायेची सावली कोण असेल तर त्या राजश्री ताई वहिनी आहेत. त्या मातेसमान असल्याचे दीपक नाना देशमुख म्हणाले.
Comments
Post a Comment