प्रस्थापित भ्रष्ट धनदांडग्यांऐवजी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या ; सत्ताधाऱ्यांचा फसव्या घोषणांपासुन सावध रहा – डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.१) बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जाती-धर्म विरहित बीडच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा” असा प्रभावी संदेश देत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज दि.०१ सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनसंपर्क करत सुजाण मतदारांना विशेष आवाहन केले.
डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, “शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरून लढणाऱ्या, चळवळीतील प्रामाणिक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या; प्रस्थापित, भ्रष्ट आणि धनदांडग्यांच्या राजकारणाला पूर्णविराम द्या.”
यावेळी रामनाथ खोड, शिवशर्मा शेलार, शेलार शिवशर्मा, शेख मुबीन, आरूण ढवळे आदी सहकारी उपस्थित होते.
निवडणुका ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असल्याचे सांगताना त्यांनी पुढे म्हटले की,
“मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता मुक्तपणे मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक प्रश्न सोडविण्याची खरी क्षमता फक्त चारित्र्यसंपन्न, विकासाभिमुख आणि लोकांशी सतत संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांत असते.”
सत्ताधाऱ्यांच्या फसव्या आणि पोकळ विकासघोषणांपासून सावध राहा, असा इशाराही त्यांनी दिला.
“आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा सक्षम उमेदवारच नगरपरिषद सभागृहात पाठवा,” असे स्पष्ट आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.
Comments
Post a Comment