पुरात वाहुन गेलेल्या चौसाळयाच्या तरुणाचा मृतदेह(सापळा) दोन महिन्याने सापडला
बीड जिल्हा ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :
बीड जिल्हयासह मराठवाड्यात ऑगस्ट- सप्टेंबर महीन्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने हाहाकार उडाला होता, त्याच वेळी दिनांक २७/०९/२०२५ रोजी चौसाळा व परिसरात झालेल्या अतिवृष्टी पावसाने चौसाळा जवळील वाडवाना -पिंपळगाव रोडवरील नदीला पूर आला होता. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते . त्याच दिवशी रात्री चौसाळा येथील युवक स्वप्निल विक्रम शिंदे वय ३३ वर्ष याचे नदीपलीकडे घर /शेती असल्याने रात्री ९ वाजता मोटरसायकल वरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असताना मोटरसायकल सहपुरात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी काही अंतरावर मोटरसायकल सापडली , यावरून तो पाण्यात वाहून गेला असल्याचा अंदाज त्याच्या नातेवाईकांना आला , त्याचा शोध घेतला असता सापडला नाही . बीड जिल्हा स्तरावरून शोध पथके पाचारण केले परंतु याचा शोध लागला नाही . हे पथके तीन दिवस शोध घेत होते परंतु कुठेच शोध लागला नाही . १५ ते २० कि,मी शोधले परंतु पथकाला त्यात अपयश आले. शेवटी शोध यंत्रणा बंद झाली . परंतु आज दिनांक २३/११/२०२५ रोजी चौसाळा बायपास जवळील पुलाच्या खाली एका खड्ड्यातील झुडपात एक मानवाच्या शरीराचा सापळा अडकलेला त्या परिसरातील ऊसतोड मजुरास व मासे पकडणाऱ्या व्यक्तीस तो दिसला, त्यांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोबाईल द्वारे कळविले असता त्याचे नातेवाईक तात्काळ त्या ठिकाणी गेले व त्यांना त्याचे कपडे व खिशात मोबाईल अशा वस्तू मुळे ते प्रेत स्वप्नील शिंदे याचेच आहे अशी खात्री पटल्यानंतरच त्या प्रेतावर दिनांक २३/११/२०२५रोजी ०५ वाजता चौसाळा येथे अंत्यसंस्कार केले .
स्वप्निलच्या मृतदेहाचा शोध तब्बल २ महिन्यांनी लागल्यामुळे सर्वच आश्चर्य वाटत आहे . स्वप्निल हा एकुलता एक होता त्याला एक सहा वर्षाचा मुलगा असुन स्वप्निल वाहून गेल्यानंतर अनेक नेत्यांनी त्याच्या घरी भेट देऊन शिंदे परिवाराचे सांत्वन केले. स्वर्गवासी स्वप्निल यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
Comments
Post a Comment