लिंबागणेश येथे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करत संविधान दिन साजरा

लिंबागणेश येथे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करत संविधान दिन साजरा
संविधान देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे :– डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :– (दि. २६) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून “राष्ट्रीय संविधान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, दगडू वाघमारे आदींची समायोजित भाषणे झाली. आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य समीर शेख यांनी केले.

कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी उपसरपंच शंकर वाणी, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, महादेव कुदळे, नामदेव आवसरे, मधुकर थोरात, नाना निर्मळ, केशव गिरे, सिताराम थोरात, महादेव ढास, ग्रामपंचायत कर्मचारी जिवन मुळे, सुखदेव वाणी तसेच अंगणवाडी सेविका बबिता निर्मळ व यमुना आबदार यांची विशेष उपस्थिती होती.


---

संविधान देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे” — डॉ. गणेश ढवळे

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत ऐतिहासिक संदर्भासह संविधानाच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी स्वतंत्र संविधान नव्हते.

म्हणूनच संविधान सभा स्थापन झाली आणि २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठित करण्यात आली.

२ वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या परिश्रमानंतर तयार झालेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.

२०१५ मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून घोषित करण्यात आला.


डॉ. ढवळे म्हणाले,
“भारतीय संविधानाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच बळकट आहे. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून देशाचे अखंडत्व, न्याय, स्वातंत्र्य व समता ही तत्त्वे संविधानामुळेच टिकून आहेत.”

त्यांनी नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर भाष्य करत सांगितले की,
“संविधान दिनी आपण कायदे पाळण्याची, जबाबदाऱ्या पार पाडण्याची शपथ घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिक जबाबदार झाला तर संविधानाचा उद्देश पूर्ण होईल आणि संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्र उभे राहील.”

डॉ. ढवळे यांनी पुढे सांगितले की भारतीय संविधान विविध धर्म, जाती, भाषा आणि संस्कृती यांना एकत्र बांधणारी राष्ट्रीय कडी आहे. संसद, विधिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, तसेच पंतप्रधान–मुख्यमंत्री यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणा संविधानाच्या चौकटीत काम करतात, ही भारताची अनोखी शक्ती आहे.

“संविधानाने दिलेले हक्क, न्याय आणि संरक्षण ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महान देणगी आहे. जगभरात भारतीय संविधानाचा आदराने उल्लेख केला जातो, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे,” असेही डॉ. ढवळे यांनी नमूद केले.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी