मनुवादी विचारसरणीच्या पक्षाची गुलामी करून निवडनूकीत उभे असणाऱ्या खापऱ्या महाराणा पाडा- डॉ. जितीन वंजारे
बीड जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्र मध्ये नगरपरिषद, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रोग्राम ठरलेला आहे, निवडणूक आली की पक्ष,विचारसरणी,जात, धर्म, पंथ, डावी, उजवी, पुरोगामी, अधोगामी सगळेच आले, मतदारांना स्वतःच्या गावातील, शहरातील, तालुका आणि जिल्ह्यातील प्रश्न सोडवणाऱ्या नेत्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे परंतु तसं न घडता दोन रुपये घेऊन , दारू,चिकन, मटन घेणे आणि सर्रास मध्ये एक दोन हजारात विकणे हे सर्रास चालू आहे.आजकाल तर काहीजण ह्या सगळ्या झंजेटीमध्ये न पडता डायरेक्ट ईव्हीएम घोटाळा करून निकालही बदलता येऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही परंतु महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणाचा अधिकार गाजवून जे जे मंडळी उभे राहणार आहेत त्यांची राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका आणि समाजाला असणारे योगदान लक्षात घेऊनच मतदारांनी मतदान करावे अन्यथा आरक्षित जागेवर मनूवादी विचारसरणीच्या पक्षाच्या लोकांचे गुलामी करून फक्त नावापुरतेच पद घेण्यासाठी उभे असणाऱ्या 'खापऱ्या महाराणा' त्याची जागा दाखवा खापऱ्या महार म्हणजे प्रस्थापित्यांचं गुलाम उठ म्हटलं उठणार बस म्हटलं बसणार,प्रस्थापित सांगेल ते काम करणारा व्यक्ती म्हणजे खापऱ्या महार होय.त्याच्या पाठीवर हात टाकल्यानंतर गोड बोलून त्याला स्वतः च्या लेकराची घाण काढायला लावून पण तो मी श्रेष्ठ आहे असं समाजाला सांगणारा गुलाम म्हणजे खापऱ्या होय. आजकाल खापऱ्या महार लोक दुसऱ्या जातीत लग्न करून आरक्षित जागेवर नकट्या सारखे लढायला येतायेत,अश्या गुलाम खापरे महाराणा निवडणुकीमध्ये जराही मतदान देऊ नका यामुळे बाबासाहेबांनी दिलेल आरक्षण हे आपली सामाजिक एकता, बंधुता, समानता अबाधित ठेवण्यासाठी दिलेलं आहे,सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी शुद्ध आचरणाने समाजात एकता समता यावी यासाठी केलेला प्रयत्न आहे, सर्व समाज एक व्हावेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारी लोक सभागृहात जावीत निर्णय प्रक्रियेत आपली लोक हवीत हा विशाल विचार समोर ठेऊन डॉ बाबासाहेबानी राजकीय आरक्षण दिले आहे ते वाया जाऊ नये, समाजाची जाण असणारा, समाजाशी एकरूप असणारा, दलित शोषित पीडित आणि मागासवर्गीयांच्या हितासाठी अविरत काम करणारा, कोणाचाही गुलाम नसणारा, स्वतंत्र विचारि,सर्व समावेशक, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करणाऱ्या सज्जनाला नक्की मतदान देऊन त्याला त्या पदावरती बसवा, खापऱ्या महार विचारसरणी च्या कार्यकर्त्याला मतदान करू नका असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
सध्या निवडणुकीमध्ये मनूवादी आणि जातीयवादी व धर्मवादी विचारसरणीच्या पक्षाचे आणि लोकांची गुलामगिरी करणारे अनेक जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ज्यांना कसल्याही प्रकारची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नाही परंतु प्रस्थापितांचे पाय जाटून मनुवादी विचारसरणीचा पाईक बनून फक्त जातीने मागासवर्गीय असल्याचे दाखवून आरक्षित जागेवर लढणाऱ्या 'खापऱ्या महाराणा' त्यांची जागा दाखवली पाहिजे निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवरती आपला माणूस जाऊन त्या ठिकाणची सरकारी व्यवस्था बदलवून सामाजिक मागासलेपणाची वंचित शोषित पिडीत्यांची शासन दरबारी कामे व्हावीत, आपल्याही समाजाचा माणूस त्या ठिकाणी आहे म्हणून हक्काने आपण त्याकडे प्रश्न आणि समस्या विचारू शकतो, आपल्या लोकांची समाजाची व्यथा त्याने सभागृहात मांडली पाहिजे म्हणून राजकीय आरक्षण महामानव, बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे. पण हल्ली आपण गावामध्ये परिस्थिती पाहत आहोत की पद म्हणजे फक्त नावापुरत दिल जात अख्खा कारभार प्रस्थापित लोकच हातात घेतात, आरक्षित जागेवरचा नेता म्हणजे सांगकाम्या गुलाम बस आणि उठ म्हटलं तर ऐकणारा दिला जातो,मग ते सरपंच असो सदस्य असो पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगरसेवक,नगराध्यक्ष अशा सगळ्याच पदांवरती हे होताना दिसत आहे आणि म्हणून स्वतंत्रविचारी,उच्च विद्याविभूषित सर्व समावेशक, समतावादी, पुरोगामी, विचारसरणी असणारा आणि शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांना मानणारा व शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनाच निवडणुकीमध्ये प्राधान्य द्या असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment