शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णय :- बाजीराव ढाकणे



बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विधवा,घटस्फोटीत,परित्यक्ता अशा एकल महिलांच्या मुलांची संख्या संकलित करण्याचे आदेश काढून एक संवेदनशील निर्णय घेतला आहे असे महाएनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. या महिलांचे अल्प शिक्षण,रोजगाराची संसाधने नसणे,सासर माहेरचा अनेकींना आधार नसणे अशा स्थितीत त्या मुलांना फार शिकवू शकत नाहीत ही बाब सन्माननीय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती हाच धागा पकडून मंत्री महोदय यांनी तातडीने उचित ठरेल अशी प्रक्रिया सुरू केली आहे त्याबद्दल महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्माननीय मंत्री महोदय भुसे यांचे बाजीराव ढाकणे यांनी आभार मानले आहेत.

मध्यंतरी शिक्षण मंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत या महिलांचे दुःख सांगितले व मुलांसाठी काही करण्याची विनंती केली पण विशेष म्हणजे या महिलांसाठी काही करण्याचे त्यांच्या मनात होते असे त्यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेही.

शिक्षण विभागात शाळांमध्ये सर्व वंचित घटकांची आकडेवारी असते पण आजपर्यंत एकल महिलांच्या मुला मुलींची आकडेवारी नव्हते. त्यामुळे नेमकी संख्या समोर नसल्याने या मुलांच्या शिक्षणासाठी काही निर्णय करता येत नाहीत.
पण आता प्रत्येक शाळेत व एकूण राज्यात किती एकल महिलांची मुले आहेत ही आकडेवारी आल्याने शिक्षण विभाग या मुलांच्या शिक्षणासाठी काही निर्णय घेऊ शकेल.
उदाहरणार्थ १० वी १२ वी ची फी माफ करायची असा निर्णय घ्यायचा तर आजपर्यंत संख्याच माहीत नव्हती. पण आता या संख्येमुळे एकल महिलांची मुले मुली हा अजेंडा बनू शकेल.शाळेतील शिक्षक ही आपल्या शाळेत किती विद्यार्थी आहेत ही संख्या बघून त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी माफी , सहल अशा प्रत्येक बाबतीत लक्ष घालतील..यापूर्वी अनेकजण करायचे पण आता अधिक सजगपणे होईल.

या एकल महिलांच्या दोन मुलांना प्रत्येकी २२५० रुपये दरमहा बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो पण बहुसंख्य एकल महिलांना ही योजनाच माहीत नाही.आमच्या राज्यातील शिक्षकांनी फक्त या योजनेची नुसती माहिती जरी या महिलांना करून दिली तरीसुद्धा हजारो मुलांना वर्षाला २७ हजार रुपये मिळतील. एकल महिला आपल्या मुलांना फार शिकवत नाहीत, मुलींचे बालविवाह करतात.पण जर इतकी मोठी रक्कम मिळाली तर नक्कीच त्या मुला मुलींनी शिकवतील.

एकल महिलांच्या मुलांची संख्या मागवल्याने एकूणच संपूर्ण शिक्षण विभाग संवेदनशील होईल त्यामुळे हा निर्णय खूप महत्वाचा आहे. मंत्री महोदय भुसे साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी ही यात महत्वाची भूमिका निभावली आहे. 
आदरणीय हेरंब दादा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून आम्ही एकल महिलांचे राज्यभर काम करतो. महिलांना विविध योजना मिळवून देतो पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेला पुढाकार आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा या कामात उत्साह वाढवणारा आहे. त्यामुळे सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय यांचे आमच्या साऊ एकल महिला समितीच्या वतीने आभार
       श्री बाजीराव ढाकणे 
बीड जिल्हा समन्वयक ,साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य       
तथा 
बीड जिल्हा समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य       
   मोबाईल नंबर 9421989909
ईमेल आयडी lekladki77@gmail.com

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी