बीड नगरपालिका सह परळी अंबाजोगाई गेवराई नगरअध्यक्षसह सर्व सहा नगरपालिकेच्या काँग्रेसचे उमेदवार यांना बहुमताने विजयी करा- रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

बीड प्रतिनिधी- बीड नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या वतीने करुणा मिलिंद मस्के नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी निवडणुकी त उभे असलेले सर्व उमेदवार व गेवराई परळी अंबाजोगाई नगरअध्यक्ष पदसहित इतर नगरसेवक उमेदवार काँग्रेसच्या वतीने उभी आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे
बीड शहर या ठिकाणी मागील 40 वर्षापासून ठराविक माणसाच्या हाती सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी जनतेचे एकही कुठले काम केलेले नाहीत शहरातील नागरिकांना कुठलीही व्यवस्था व सुविधा पुरविलेली नाही उदाहरणार्थ घरासमोरील नाल्याची व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन रस्ता हे फक्त गुत्तेदार पोसण्यासाठी टेंडर काढून त्यांच्या घशात घातलेल्या आहेत.व आणि त्याचे बोगस बील उचलून स्वार्थ साधलेला आहे.त्याच धर्तीवर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आज पर्यंत आंदोलने विविध निवेदने देऊन रस्त्याचे काम करू म्हणून फक्त आश्वासन देतात व काम करीत नाहीत.त्या साठी आता येणाऱ्या नगरपालिकेच्या सध्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त पैसा देऊन मते घेतात व पैसा कमवितात हे रणनीती बंद करण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन सगळे उमेदवार उभा केलेले आहेत तरी सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांना व संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना इंटक च्या वतीने आव्हान करण्यात येते की येणाऱ्या दिनांक 2 डिसेंबर2025 रोजी काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे तरी दोन दिवसाच्या कुठल्याही भूल थापाला बळी न पडता येणाऱ्या स्वार्थासाठी व आपल्या हक्कासाठी येणार काँग्रेस पक्षाला बहुमताने मतदान रूपाने आशीर्वाद द्या
  शहरवासीच्या हक्कासाठी व शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात महिला साठी स्वच्छता घर व तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगली सुरक्षित व शहराला विकासासाठी चालना देण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरलेले असून खासदार सौ.रंजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांची ताकद या सर्व उमेदवाराच्या पाठीशी असून बीड शहराच्या विकासासाठी 
काँग्रेसच्या पंजा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजय करावे असे आव्हान इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी केले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी