आम आदमी पार्टी न.प. निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे प्रस्थापितांचे दणाणले धाबे
आम आदमी पार्टी न.प. निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे प्रस्थापितांचे दणाणले धाबे
माजी सैनिक अशोक येडे – जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड
बीड नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्वबळावर दमदार पणे प्रवेश केला असून नगराध्यक्ष पदासह 16 प्रभागांत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. लोकाभिमुख, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पर्याय उभा राहिल्याने वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापित गटांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मतदारांना खऱ्या अर्थाने विकासाचा, प्रामाणिकतेचा आणि स्वच्छ राजकारणाचा पर्याय मिळत असल्यामुळे काही विरोधक आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना लालच, दबाव व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
परंतु आम आदमी पार्टीचा एकही कार्यकर्ता वा उमेदवार दबावाला बळी पडणार नाही.”
कारण आम आदमी पार्टीची ताकद म्हणजे जनतेचा विश्वास व प्रामाणिक लढा.
सत्तेच्या लालसेपोटी सुरू असलेल्या राजकीय डावपेचांपुढे आमचे उमेदवार खंबीरपणे उभे आहेत.
जनतेसमोर दिलेल्या पर्यायामुळे प्रस्थापितांची झोप उडाली आहे.
नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यावर आम आदमी पार्टी पूर्णपणे सक्षम आहे.
बीड शहरातील प्रत्येक मतदारामध्ये आज बदलाची तीव्र इच्छा आहे, आणि आम आदमी पार्टी हा बदल आणणार आहे.
Comments
Post a Comment