आजवर दिलेल्या शासन निधींचे काय दिवे पाजळले? हे फडणवीसांनी स्पष्ट करावे-बीड शहर बचाव मंचाची मुख्यमंत्र्यांना मागणी
बीड प्रतिनिधी :- बीड शहरातील प्रस्थापितांना नगरपालिकेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मागील पाच वर्षात आणि या चालू तीन वर्षात कोणते व किती शासन निधी देण्यात आले, त्यात या प्रस्थापित दिवट्यांनी विकासाचे काय दिवे पाजळले...? कुठल्या योजना अपूर्ण ठेवल्या, कुठली विकास कामे पूर्णत्वाला नेली, कुठल्या कुठल्या योजना व कुठले कुठले निधी गिळंकृत केले या सर्व बाबींचा तपशीलवार खुलासा उद्या फडणवीस साहेबांनी जनतेपुढे मांडावा. अटल अमृत जल योजनेचे काय झाले ती कुठल्या टप्प्यावर आहे ? भुयारी गटार योजनेची कामे कुठल्या टप्प्यावर आहेत ..? याचाही खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या जनतेपुढे करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत नगर पुनरुत्थानच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री निधीतून व वेगवेगळ्या खात्यांमधून विकास योजनांतर्गत किती पैसे बीड नगरपालिकेतून विकास करण्यासाठी प्रस्थापित दिवट्यांना पुरविले, त्याचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात आला, त्यातून किती विकास कामे 100% दर्जेदार आणि पूर्ण झाली, नाल्या, गटार, रस्ते विकास यासाठी शासनाचे किती कोटींचे निधी पुरवण्यात आले याचा तपशील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जनतेपुढे मांडावा अशी मागणी बीड शहरातील जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करत आहे.
Comments
Post a Comment